मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'पुन्हा आणणार सत्ता...' दिल्लीत जाण्याची चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

'पुन्हा आणणार सत्ता...' दिल्लीत जाण्याची चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

'राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत नाही, तो पर्यंत संघर्ष करणार आणि पुन्हा सरकार आणणार.'

'राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत नाही, तो पर्यंत संघर्ष करणार आणि पुन्हा सरकार आणणार.'

'राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत नाही, तो पर्यंत संघर्ष करणार आणि पुन्हा सरकार आणणार.'

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 8 फेब्रुवारी : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या केंद्रात जाण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. 'मी मैदान सोडून पळून जाणाऱ्यांपैकी नाही. जोपर्यंत राज्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत नाही, तोपर्यंत संघर्ष करणार आणि पुन्हा सरकार आणणार,' असा एल्गार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील परळ इथं झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर खरमरीत टीका केली. 'राजकीय हाराकिरी करून आलेलं हे सरकार आहे. ते जास्त दिवस टिकणार नाही,' असा अंदाजही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसंच मागच्या वेळी राहिलेली कसर भरून काढत आगामी काळात पुन्हा आपलं सरकार आणू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. फडणवीसांबाबत काय होती चर्चा? माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून केंद्रात बोलावण्याची शक्यता आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन महाराष्ट्रात नव्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते. असं झालं तर चंद्रकांत पाटील यांची विरोधी पक्षनेते पदावर निवड होऊ शकते तर पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकते. भाजपचं पुन्हा 'ऑपरेशन लोटस'? राज्यातल्या महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन आता तीन महिने होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तीन वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं पुढे आलंय. त्याचाच फायदा घेत भाजप ठाकरे सरकारविरुद्ध व्यूहरचना आखत असून राज्य सरकारला धक्का देण्यासाठी तयारी करत आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे भाजपचे हायकमांड सध्या दिल्लीत व्यस्त आहेत. त्यामुळे दिल्ली निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा 'ऑपरेशन लोटस' सुरू होणार असल्याची चर्चा होत असल्याने महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.
First published:

पुढील बातम्या