'15 फेब्रुवारीला Anil Deshmukh मुंबईतच होते, शरद पवारांना अयोग्य माहिती दिली गेली', फडणवीसांचा गंभीर आरोप
'15 फेब्रुवारीला Anil Deshmukh मुंबईतच होते, शरद पवारांना अयोग्य माहिती दिली गेली', फडणवीसांचा गंभीर आरोप
Devendra Fadanvis PC: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) मुंबईत पत्रकार परिषद घेत गृहमंत्र्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेले दावे देखील त्यांनी फेटाळले आहेत.
मुंबई, 23 मार्च: सचिन वाझे प्रकरणात (Sachin Vaze Case) गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis)मुंबईत पत्रकार परिषद घेत गृहमंत्र्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेले दावे देखील त्यांनी फेटाळले आहेत. फडणवीस असं म्हणाले की, 'कारमायकल रोड स्फोटकं प्रकरणी अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात लिहिले आहे. शरद पवार यांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. शरद पवार यांनी केलेल्या ट्वीटनुसार देशमुख नागपुरात क्वारंटाइन होते असल्याचा भास होतो. पण, अनिल देशमुख हे 15 तारखेलाच विमानाने मुंबईला गेले होते. ते 15 फेब्रुवारीपासून मुंबईत होते,' असा आरोप फडणवीसांनी केला.
मुंबईत आल्यानंतर ते अनेकांना भेटल्याचा दावा फडणवीस यांनी केला, शिवाय पवारांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे असा टोलाही फडणवीसांनी लगावला. शरद पवारांनी अनिल देशमुखांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांचा प्रत्येक दावा पुरावा देऊन फडणवीसांनी फेटाळला आहे. देशमुख क्वारंटाइन दरम्यान अनेकांना भेटले आणि ही माहिती काढणं फार सोपं असल्याचंही फडणवीस म्हणाले.
(हे वाचा-पोलीस दलातील बदल्यांवरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप)
ते पुढे म्हणाले की, 'पोलिसांकडे कुणी कुठे जाणार काय करणार याबद्दल नोंद असते. 17 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख हे सह्याद्री अतिथी गृहावर आले होते. 24 फेब्रुवारी रोजी पुन्हा अनिल देशमुख यांनी कारने प्रवास केला होता. अशी नोंद आहे, पण त्यांनी प्रवास केला की, नाही यावर मी बोलणार नाही. शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली.' क्वारंटाइनच्या काळात अनिल देशमुख हे अनेक लोकांना भेटले होते, असा आरोपही फडणवीसांनी केला.
काय म्हणाले अनिल देशमुख?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लेटर बॉम्ब टाकल्यामुळे राजाचे राजकारण ढवळून निघाले आहे. अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले जात आहेत. अनिल देशमुखांकडून वारंवार हे आरोप फेटाळले जात आहेत. शिवाय शरद पवार आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते देशमुखांना प्रोटेक्ट करत असल्याचा आरोप होतो आहे. अनिल देशमुखांनी देखील मंगळवारी ट्विटरवरून एक व्हिडीओ जारी करत फेब्रुवारी महिन्यात काय काय घडले याचा घटनाक्रमसांगितला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार ते 15 फेब्रुवारीला खाजगी विमानाने मुंबईत आले पण त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाइन होते. इतक्या दिवसात त्यांनी 28 फेब्रुवारीली त्यांचे मुंबईतील सरकारी निवासस्थान सोडले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.