फक्त खुर्ची टिकवण्यासाठी! 26 हजार कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट

फक्त खुर्ची टिकवण्यासाठी! 26 हजार कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सुमारे 26 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सुमारे 26 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या एसआयटीने अजित पवार यांच्यासह 76 जणांना क्लीनचीट दिली आहे. यावरून विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा...हे लोकनियुक्त सरकार नाही, बेईमानानं आलेलं सरकार; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

26 हजार कोटींचा घोटाळा झाला असताना क्लीन चिट कसे काय देताय? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फक्त खुर्ची टिकवण्यासाठी हे चालू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. सत्ता वाचवताना काय चाललंय याच्याकडे लक्ष आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कोरोना महामारी, महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी- कामगार कायदा, अशा विविध मुद्द्यांवरुन चौफेर टीका केली.

सरकारमधील मंत्र्यांना झोप कशी लागते? एकट्या महाराष्ट्रात 15 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 39 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे तर अधिकृत आकडे आहेत. अनधिकृत आकडे किती असतील. महाराष्ट्रात आकड्यात मृत्युंच्या 15 हजारांचा फरक आहे, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार केला.

आमचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. कोणीही घरी बसलेले नाही आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उद्धवजी तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, इतके बदललात ? बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सुपुत्र आहात, देव-देश-धर्माची लढाई तुम्ही विसरले आहात? हे लोकनियुक्त सरकार नाही, बेईमानानं आलेलं सरकार आहे, अशी जहरी टीका फडणवीस यांनी केली.

अजित पवार यांच्यासह 76 जणांना क्लीनचीट

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेच्या 26 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह 76 जणांना क्लीनचीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. 26 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता.

हेही वाचा...जेपी नड्डा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण...

त्यानंतर 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेनं बर्खास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांसह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 76 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि 467 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, भाजपात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांसह अन्य पक्षातील नेत्यांच्या नावाचा समावेश होता.

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या