मुंबई, 05 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज18 लोकमतशी संवाद साधला. युती, जागा वाटपासह अनेक प्रश्नांना त्यांनी बेधडक उत्तरं दिली. व्यापक विचार करून युतीचा निर्णय झाला. तसंच ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचं तिकीट कापण्याकरता शिवसेनेचा कोणताही दबाव नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणत आहेत मुख्यमंत्री
- लोक भाजपकडे आकर्षिक होत आहेत.
- शिवसेना-भाजप दोन्ही पक्षांनी एकत्र यावे ही जनतेची इच्छा होती.
- यंदा 2014पेक्षा मोठी लाट.
- काँग्रेसमध्ये अनेक जण अस्वस्थ.
- आम्ही घरं फोडणाऱ्यापैकी नाही.
- मोदींच्या नेतृत्वात मोठं यश मिळेल.
- काँग्रेस शरद पवार चालवत आहेत.
- किरीट सोमय्या यांना मोठी जबाबदारी मिळणार.
- प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा योग्य मार्गानं जायला हवा.
- 2014मध्ये महादेव जानकर यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर चित्र वेगळं असतं.
ईशान्य मुंबईत किरीट सोमय्यांना का डाववलं? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @umeshk73 pic.twitter.com/9GkNDZxBvY
— News18Lokmat (@News18lokmat) April 5, 2019
- पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीमध्ये उतरणार.
- नव्या पिढीमध्ये नरेंद्र मोदींबद्दल आदर.
- लोक भाजपकडे आकर्षक होत आहेत.
- सेना -भाजपनं एकत्र यावी ही जनतेची इच्छा.
- सोमय्यांच्या जवळचे म्हणून मनोज कोटक यांनी तिकीट.
- दिलीप गांधींना पक्षात योग्य जबाबदारी मिळेल.
- PM मोदी डायरेक्ट अॅक्शन घेतात.
- निवडणुकीच्या रिंगणात फिक्सिंग नाही.
- माढ्यात राष्ट्रवादीविरोधी लाच.
- राज ठाकरेंच्या सभेमुळे मनसेचा मतदार भाजप - सेनेकडे येईल.
साडेचार वर्षे भांडणारी भाजप-शिवसेना आता एकत्र कसे? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @umeshk73 pic.twitter.com/kqW98bZ9rQ
— News18Lokmat (@News18lokmat) April 5, 2019
भाजपला आयात उमेदवारांची गरज का पडतेय? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @umeshk73 pic.twitter.com/bT7hSAyTY3
— News18Lokmat (@News18lokmat) April 5, 2019
- मान न मान मै तेरा मेहमान अशी राज ठाकरेंची अवस्था.
- राज ठाकरेंच्या सभांनी काहीही परिणाम होणार नाही.
- राज ठाकरेंच्या सभांचा फायदा मोदींना होईल.
- दुष्काळाकडे अजिबात दुर्लक्ष नाही.
- जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे दुष्काळाबाबतचे पूर्ण अधिकार.
- दुष्काळ निवारणासाठी पूर्ण तयारी.
- काँग्रेस-राष्ट्रवादीने राज ठाकरे यांना आघाडीत का घेतल नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
- 20 टक्के गरिबांच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी काँग्रेस काय करणार? पैसा आणणार कुठून?.
- राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली का?.
- मोदींच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधार.
- लोकांचा काँग्रेसवर विश्नास नाही.
- नरेंद्र मोदींनी केलं गरिबी हटवण्याचं काम.
- जेलच्या रांगेत कोण आहे? राहुल गांधी यांना देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
- राज्यात शिवसेना - भाजपची सत्ता येणार.
- केंद्रात देखील भाजप, एनडीएची सत्ता येणार.