सिंचन घोटाळ्यात भाजपने अजित पवारांना क्लीन चिट दिली का? देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा

सिंचन घोटाळ्यात भाजपने अजित पवारांना क्लीन चिट दिली का? देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा

महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला पहिल्यांदाच मुलाखत दिलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतरच अजित पवारांना सिंचन घोटाळ्यामध्ये क्लीन चिट देण्यात आली, अशी चर्चा आहे. यावर आता माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला पहिल्यांदाच मुलाखत दिलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतरच अजित पवारांना सिंचन घोटाळ्यामध्ये क्लीन चिट देण्यात आली, अशी चर्चा आहे. यावर आता माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

'कोणतंही डील नाही'

सिंचन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार दोषी नाहीत, त्यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी स्वरूपाची जबाबादारी निश्चित करता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र अँटीकरप्शन ब्युरोने नागपूर खंडपीठात दिलं आहे. पण नवं सरकार येण्यापूर्वीच हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. भाजपने अजित पवारांशी कोणतंही डील केलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सिंचन घोटाळ्याबद्दलचं प्रतिज्ञापत्र 27 तारखेला संध्याकाळी दाखल झालं. या घडामोडी माझ्या राजीनाम्यानंतर झाल्या, असंही त्यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. अजित पवारांबदद्लचं हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात टिकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. हे प्रतिज्ञापत्र आणि आमचा शपथविधी यांचा काहीही संबंध नाही, हेही माजी मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं.

(हेही वाचा : 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी अखेर उलगडलं राजकारण)

सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार

2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. ही चौकशी अँटी करप्शन विभागाने सुरू केली. त्यानंतर नागपूर विभागात 20 आणि अमरावती विभागात 4 गुन्हे दाखल झाले होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा 23 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर लगेचच 26 नोव्हेंबरला या दोघांनीही राजीनामा दिला. त्याआधीच सिंचन घोटाळ्यातली काही प्रकरणं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी चर्चा आहे.

मागच्या वर्षी प्रतिज्ञापत्र

सिंचन घोटाळ्याला अजित पवार हेच जबाबदार आहेत, अशी माहिती देणारं प्रतिज्ञापत्र मागच्याच वर्षी अँटी करप्शन ब्युरोने दिलं होतं. पण त्यानंतर अजित पवार यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे.

======================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 7, 2019, 9:35 PM IST

ताज्या बातम्या