Home /News /maharashtra /

26/11 हल्ल्यातील साक्षीदाराच्या मदतीला धावून आले फडणवीस, केली मदतीची घोषणा

26/11 हल्ल्यातील साक्षीदाराच्या मदतीला धावून आले फडणवीस, केली मदतीची घोषणा

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावर आढळून आले होते. त्यानंतर त्यांना कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कल्याण, 11 मे : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्लात अजमल कसाब या दहशतवाद्याने तुकाराम ओंबळे यांच्यासह निष्पाप लोकांचा जीव घेतला होता. पण, या प्रकरणातील साक्षीदारांनी कसाब विरोधात साक्ष देऊन त्याला फासावर लटकावले. या साक्षीदारांपैकी एक असलेल्या हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना हलाखीचे जीवन जगावे लागत असल्याची बाब समोर आली. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन भरीव मदत जाहीर केली आहे. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावर आढळून आले होते. त्यानंतर त्यांना कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.  आज हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपसू करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला आले होते. हेही वाचा -देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली तत्काळ मागणी, म्हणाले... यावेळी फडणवीस यांनी हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. तसंच,  श्रीवर्धनकर यांच्या उपचाराचा खर्च भाजप पक्ष करणार आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. तसंच, भाजपतर्फे श्रीवर्धनकर कुटुंबीयांना 10 लाखांचा मदत निधी देण्यात येणार असल्याचंही जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वी 60 वर्षीय हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मुंबईच्या रस्त्यांवर अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले होते. जवळच असलेल्या दुकानदाराची नजर त्यांच्यावर पडली, त्यांनी हरिश्चंद्र यांची मदतही केली.  हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना कुटुंबियांनी घरातून बाहेर काढलं होतं. राहायला जागा आणि अन्न नसल्यामुळं हरिश्चंद्र गेले कित्येक दिवस मुंबईच्या रस्त्यांवर होते. याचवेळी Saath Rasta shop चे मालक डीन डिसुजा यांनी त्यांची मदत केली. त्यानंतर डिसुजा यांनी हरिश्चंद्र यांना पहिले तेव्हा त्यांनी प्रकृती खराब होती. त्यामुळं त्यांनी निराधारांसाठी IMCares नावाच्या स्वयंसेवी संस्था चालवणारे त्यांचे मित्र गायकवाड यांची मदत घेतली. त्यानंतर श्रीवर्धनकर यांच्याबद्दल माहिती समोर आली. हेही वाचा -मोदी सरकारची ही योजना तरुणांंसाठी फायदेशीर, मिळणार 3.75 लाखांची मदत 26/11च्या हल्ल्यात श्रीवर्धनकर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती.  श्रीवर्धनकर हे अजमल कसाबला ओळखणार्‍या मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी कामा हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार सुरू केला तेव्हा हरिश्चंद्र यांना गोळीही लागली होती. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Witness

पुढील बातम्या