फडणवीसांकडून पवारांना मोठा धक्का, सरकारने अखेर घेतला निर्णय

फडणवीसांकडून पवारांना मोठा धक्का, सरकारने अखेर घेतला निर्णय

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत नीरा कालव्यातून आता फलटण आणि माळशिरस या तालुक्यांत हे पाणी जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जून : नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे बेकायदेशीरपणे पाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत नीरा कालव्यातून आता फलटण आणि माळशिरस या तालुक्यांत हे पाणी जाणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाने आदेश काढला आहे. या निर्णयाचा फटका बारामतीशेजारील इंदापूर या तालुक्यालाही बसणार आहे. त्यामुळे आगामी काळात हा पाणीप्रश्न आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे ५७ टक्के तर डाव्या कालव्याद्वारे ४३ टक्के पाणी वाटपाचे धोरण १९५४ च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस , सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातुन बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते. ४ एप्रिल २००७ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात स्वतःची राजकीय ताकद वापरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सन २००९ मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये नीरा देवघर धरणातून ६० टक्के पाणी डाव्या कालव्यातुन बारामती व इंदापूर तालुक्याला व ४० टक्के पाणी फलटण , माळशिरस , सांगोला व पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतचा करण्यात आला होता.

विधान परिषदेचे सभापतीपद मिळाल्याने रामराजे नाईक निंबाळकर यांनी या कराराला विरोध न करता संमती दिली होती. ३ एप्रिल २०१७ ला हा करार संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे हे पाणी बारामती तालुक्याला दिले जात होते. हे बेकायदा जाणारे पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण , माळशिरस , सांगोला व पंढरपुर तालुक्यांना मिळावे अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.

SPECIAL REPORT: उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं नेमकं काय ठरलंय?

First published: June 12, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading