Elec-widget

देवेंद्र फडणवीसांनी स्टेटस बदललं, सोशल मीडियावर लिहलं...

देवेंद्र फडणवीसांनी स्टेटस बदललं, सोशल मीडियावर लिहलं...

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेली काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी संपुष्टात आली.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भाजप-सेनेत मतभेदांमुळे सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईपर्यंतच्या काळात त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद होते. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला वेळेत सत्ता स्थापनेसाठी दावा करता आला नाही. त्यासाठी वेळ वाढवून मागितली मात्र, राज्यपालांनी त्यासाठी नकार दिला. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

राष्ट्रपती राजवट लागू होतात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही संपुष्टात आली. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या नावापुढे असलेलं काळजीवाहू मुख्यमंत्रिपद काढलं असून तिथं महाराष्ट्र सेवक असं लिहलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी नावापुढे काळजीवाहू मुख्यमंत्री असं लिहिलं होतं. आता तोसुद्धा काढून टाकला आहे.

भाजपने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण दिलं. त्यांना दिलेल्या वेळेत पाठिंब्याचं पत्र सादर करता आलं नाही. शेवटी राष्ट्रवादीलाही संधी दिली. त्यांनीही वेळ वाढवून मागितली मात्र राज्यपालांनी नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यावर मंगळवारी सायंकाळी शिक्कामोर्तब झाले.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

Loading...

भारताच्या राज्यघटनेत कलम 352 ते 360 ही आणीबाणीशी संबंधित आहेत. यामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. 1)राष्ट्रीय आणीबाणी, 2)आर्थिक आणीबाणी, 3) राष्ट्रपती राजवट.कलम 356 नुसार राज्यातील प्रशासन घटनेनुसार चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. तसेच ज्या राज्यातील सरकार केंद्राच्या आदेशांकडे दुर्लक्ष करते अशा ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते.

हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतला जातो. तसेच राज्यपाल यासाठीचा अहवाल राष्ट्रपतींना सोपवतात आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवटीची घोषणा करण्यात येते.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्याला संसदेची मान्यता आवश्यक असते. त्यानंतर सहा महिने राष्ट्रपती राजवट लागू करता येते. मात्र, संसदेनं पुन्हा पुढच्या सहा महिन्यांसाठी मान्यता दिली तर हा कालावधी वाढू शकतो. अशा पद्धतीने जास्ती जास्त तीन वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येते.

महाराष्ट्रात कधी लागली होती राष्ट्रपती राजवट ?

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली. याआधी 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागली होती.

जाणून घ्या राष्ट्रपती राजवट कधी लागू होते आणि त्यानंतर राज्यकारभार चालतो कसा

VIDEO : भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...