Home /News /maharashtra /

मोठी बातमी, OBC आरक्षणासाठी महत्त्वाची घडामोड, राज्य सरकारने काढली महत्त्वाची अधिसूचना

मोठी बातमी, OBC आरक्षणासाठी महत्त्वाची घडामोड, राज्य सरकारने काढली महत्त्वाची अधिसूचना

 राज्य मागासवर्ग आयोगाकडून इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम काढून घेण्यात आलं आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाकडून इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम काढून घेण्यात आलं आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाकडून इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम काढून घेण्यात आलं आहे.

  पुणे, 10 मार्च : ओबीसी आरक्षणावरून (obc reservation) महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) खलबत सुरू आहे. अशातच न्यायधीश निरगुडकर यांच्या अध्यक्षते खालील राज्य मागासवर्ग आयोगाची ओबीसी राजकीय आरक्षणासाठीची समर्पित आयोग म्हणून मान्यता रद्ध करण्याची अधिसूचना राज्य शासनाची जारी केली आहे. त्यामुळे आता नवीन समितीकडून डाटा गोळा केला जाणार आहे. राज्य सरकारने एक अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार, निरगुडकर यांच्या अध्यक्षते खालील राज्य मागासवर्ग आयोगाची ओबीसी राजकीय आरक्षणासाठीची समर्पित आयोग म्हणून मान्यता रद्द करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम काढून घेण्यात आलं आहे. तेच काम आता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जयंत बंथिया समितीकडे सोपवण्यात आले आहे. यासोबतच ओबीसीचं राजकीय आरक्षण निश्चितीचे कामही याच नवीन समीतीकडे वर्ग करण्यात आले आहे. ('माझ्याशी वाईट वागणाऱ्यांना मी सोडत नाही...'. तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत) सध्याच्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाचा विषय राहिल तसंच ओबीसी प्रवर्गात कोणत्या नवीन जातींचा समावेश करायचा आणि कोणत्या जाती वगळायच्या याचे कामकाज पूर्वी प्रमाणेच चालू राहणार हे. जयंत बंथिया यांच्या समितीमध्ये माजी सनदी अधिकारी महेश झगडे, चंद्रकांत दळवी आणि tiss expert, IIT Mumbai चे एक Professor सदस्य म्हणून असणार आहेत. (उत्पल पर्रीकरांना परत भाजपात घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणतात....) आता ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जयंत बंथिया समितीवर असणार आहे.  यासोबतच ओबीसीचं राजकीय आरक्षण निश्चितीचे कामही याच नवीन समीतीकडे वर्ग करण्यात आले आहे.र सध्याच्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाचा विषय राहिल तसंच ओबीसी प्रवर्गात कोणत्या नवीन जातींचा समावेश करायचा आणि कोणत्या जाती वगळायच्या याचे कामकाज पूर्वी प्रमाणेच चालू राहणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या