मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Maharashtra Water Crisis : राज्यात पावसाचे थैमान परंतु शेकडो गावांना पाणी टंचाई, टँकरने तहान भागवली जातेय

Maharashtra Water Crisis : राज्यात पावसाचे थैमान परंतु शेकडो गावांना पाणी टंचाई, टँकरने तहान भागवली जातेय

राज्यात कोकणपासून विदर्भापर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी राज्यातील काही गावांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. (Maharashtra water crisis)

राज्यात कोकणपासून विदर्भापर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी राज्यातील काही गावांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. (Maharashtra water crisis)

राज्यात कोकणपासून विदर्भापर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी राज्यातील काही गावांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. (Maharashtra water crisis)

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 13 जुलै : राज्यात मागच्या एक आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे. (Maharashtra rain update) काही जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याने नुकसान झाले आहे, तर काही जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टीने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान राज्यात कोकणपासून विदर्भापर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी राज्यातील काही गावांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. (Maharashtra water crisis) राज्यात सध्या 306 गावांना तर 526 वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जात असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. (water crisis)

पावसाळा सुरू होऊन जवळपास सव्वा महिना लोटला आहे. या कालावधीत कमीअधिक पाऊस झाला. मात्र, गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे राज्यातील टँकरच्या संख्येत तब्बल 213 टँकरने घट झाली आहे. सध्या 306 गावे व 526 वाड्यावस्त्यांवर 283 टँकरने पाणी पुरवठा सुरू असून येत्या काळात ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : कोल्हापूरमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, गावांचा संपर्क तुटला, पंचगंगा इशारा पातळीकडे

राज्यात चालू वर्षी 14 मार्चपासून पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला पाच जिल्ह्यांतील 60 गावे व 93 वाड्यांना 34 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे टँकरच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. त्यातच मॉन्सून राज्यात दाखल होऊनही पुरेसा पाऊस न पडल्याने ऐन जूनमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या होत्या. त्यामुळे टँकरच्या संख्येत वाढ झाल्याची स्थिती होती.

उन्हाळ्यात नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून त्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याऐवजी प्रांताधिकारांना दिले आहे. त्यामुळे या टँकरच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. जून महिना अखेरीपर्यंत राज्यातील 610 गावे व 1266 वाड्यावस्त्यांवर जवळपास 496 टँकर रोज धावत होते. यामध्ये सरकारी 66 तर खासगी 430 टँकरचा समावेश होता. पावसामुळे आता दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा : राज्यात पावसाची संततधार सुरुच, पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; अनेक नद्यांना पूर

पुढचे दोन दिवस 5 जिल्हांना रेड अलर्ट

पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert in five District) जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

First published:

Tags: Monsoon, Rainfall, Water crisis