विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबळवर धरला ठेका, पाहा VIDEO

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी संबळवर धरला ठेका, पाहा VIDEO

आपल्या सुपुत्राच्या लग्नात आमदार झिरवाळ यांनी संबळवर ठेका धरला.

  • Share this:

नाशिक, 02 जुलै : विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा तुफान चर्चेत आले आहेत. याचं कारणही तितकच खास आहे. आपल्या सुपुत्राच्या लग्नात आमदार झिरवाळ यांनी संबळवर ठेका धरला. त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या मुलाचा विवाहसोहळा मंगळवारी कंजाळी इथे पार पडला. फेसबुक लाईव्ह द्वारे हा सोहळ्याची दृश्य अनेक वऱ्हाडीमंडळींना पाहता आली. अनेकांनी झिरवाळ यांच्या मुलाला लग्नासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या. या लग्नसोहळ्यात आनंद साजरा करताना झिरवाळ यांनी संबळ वाद्यावर तुफान डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-डिलिव्हरी बॉयच्या हातात बॉक्समध्ये झाला स्फोट, घडला विचित्र प्रकार

झिरवाळ हे नाशिकच्या दिंडोरी पेठ मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मंगळवारी त्यांच्या मुलाचा ऑनलाइन विवाहसोहळा पार पडला. या कौटुंबिक विवाह सोहळ्यात त्यांनी संबळवर ठेवा धरून आनंद साजरा केला.

काही दिवसांपूर्वी झिरवाळ यांनी सभागृहात केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा आमदार झिरवाळ यांच्या डान्सची चर्चा रंगली आहे. सुपुत्र आणि सुनेला लग्नगाठ बांधल्यानंतर भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छाही दिल्या आहेत.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 2, 2020, 8:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading