सोलापूर, 17 ऑक्टोबर: महाराष्ट्रात कलम 365 अर्थात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटळली आहे. महाराष्ट्रात 365 चा वापर करणं एवढं सोपं नाही. बहुमत असल्यानंतर कोणीही लगेच सरकार पाडू शकत नाही. त्यामुळे उगाचच अनावश्यक चर्चा करु नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना फटकारलं.
अजित पवार सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. अतिवृष्टी व पूरबाधित भागांची ते पाहाणी करत आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.
हेही वाचा..कंगनाला 'टिवटिव' भोवणार! वांद्रे पोलिसांनी दाखल केला राजद्रोहाचा गुन्हा
सोलापूर जिल्ह्याचा वर्षाचा निम्मा पाऊस एकाच वेळी पडला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. तर उद्या शरद पवार हे उस्मानाबादला जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. एकूण 18 लोक मृत्यूमुखी पडले. अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी पोल उभे करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. लोक म्हणतात की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. पण अजून तशी परिस्थिती नाही. फळबाग आणि पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करावेत, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्राची भरीव मदत लागणार..
पंतप्रधान नरेंद्र मोदी vc द्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. पण केंद्राची भरीव मदत लागणार आहे. केंद्रीय पथकाने यावे आणि राज्यातील पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करावा. त्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल, असं अजित पवार या वेळी म्हणाले. मुख्यमंत्री स्वतः येवून जे काही मदत द्यायची असेल ती ते स्वतः जाहीर करतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता
कोरोनामुळे जगाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. त्यामुळे भारत देखील अडचणीत सापडला आहे. ऑक्टोबरपासून कोरोनाचा फैलाव कमी झालाय ही समाधानाची बाब आहे. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पथकानं सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबवत आहे. शासनाचे अनेक कर्मचारी गावगावात घरोघरी जाऊन तपासणी करत आहे. त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं.
हेही वाचा..आता ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस; Sputnik V च्या ट्रायलला मंजुरीराज्यानं काढलं 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज
एप्रिलपासून सहा महिन्यापासून कोरोना, सार्वजनिक आरोग्य खाते, पोलीस खाते, मदत पुनवर्सन यांचं मानधन दिलं आहे
राज्यानं 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढलं आहे. केंद्र सरकार सुरुवातीला कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागणाऱ्या वस्तू देत होतं. मात्र आता मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर देणे बंद केले आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.