मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...बदला लेने के लिए जीना पडता है!' पहाटेच्या भळभळत्या जखमेबद्दल फडणवीसांचं मोठं विधान   

'...बदला लेने के लिए जीना पडता है!' पहाटेच्या भळभळत्या जखमेबद्दल फडणवीसांचं मोठं विधान   

मोदी कधी तुम्हाला ओरडले का?, कधी वाटलं का राजकारण सोडून देऊ?, यासारख्या अनेक प्रश्नांवर फडणवीसांनी उत्तरं दिली.

मोदी कधी तुम्हाला ओरडले का?, कधी वाटलं का राजकारण सोडून देऊ?, यासारख्या अनेक प्रश्नांवर फडणवीसांनी उत्तरं दिली.

मोदी कधी तुम्हाला ओरडले का?, कधी वाटलं का राजकारण सोडून देऊ?, यासारख्या अनेक प्रश्नांवर फडणवीसांनी उत्तरं दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अनोख्या शैलीत CNN News18 येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीपासून ते एकनाथ शिंदेंपर्यंत अनेक गोष्टींवर आपलं मत खुलेपणाने मांडलं. उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे भाजप किंवा दुसरं कोणी जबाबदारी नसून स्वत: उद्धव ठाकरे यासाठी जबाबदार असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

मुलाखतीच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर त्यांना हो किंवा नाही अशा स्वरुपात द्यायचं होतं. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आली. कोरोना काळात घरात मदत केली का?, मोदी कधी तुम्हाला ओरडले का?, कधी वाटलं का राजकारण सोडून देऊ?, कधी भाषण आणि नेत्याची नावं विसरलात का? अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. शेवटचा प्रश्न हा अजित पवारांबद्दल होता. अजित पवारांसोबत घेतलेला शपथविधीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ती चूक असल्याचं त्यांनी मान्य केलं.

युती तुटली कशी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं..

मात्र शेवटी ते एक वाक्य म्हणाले की, राजकारणात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात कारण जेव्हा तुमच्या पाठीत खंजीर खुपसलं जातं त्यावेळी बदला घेण्यासाठी तुम्हाला जीवंत राहावं लागतं, असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांसोबत झालेल्या त्या शपथविधीबद्दल आपली भूमिका व्यक्त केली.

" isDesktop="true" id="759168" >

फडणवीसांच्या मुलाखतीतील महत्त्वाची विधानं..

-'मी चाणक्य नाही, सत्तांतरात माझा वाटा'

-उद्धव ठाकरे हेच सत्तांसाठी जबाबदार

-उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानं सत्तांतर

-ठाकरेंनी तशी परिस्थिती आणल्यानं सत्तांतर

-'सरकार पडेल आणि कळणारही नाही'

-'मी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं'

-'शिवसेना तोडण्यासाठी ठाकरेच जबाबदार'

-'शिंदे मुख्यमंत्री होणार हे ठरलेलं होतं'

-पक्षादेश मान्य करून सरकारमध्ये आलो

-सरकारनं कोविड मृतांचे आकडे लपवले​

-'सरकार फेसबुकवर, लोक रुग्णालयात'

-ठाकरेंच्या काळात सरकार फेसबुकवरून हाकलं

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis