अमरावती, 05 ऑक्टोबर : राज्यभरात जिल्हा बँका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील (mva govenment) तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढण्याची चर्चा करत आहे. तर दुसरीकडे अमरावती (Amravati District Bank Election) जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी थेट उपमुख्यंत्री (Deputy Chief Minister office) आणि गृहमंत्री कार्यालयावर (Home Ministers office) गंभीर आरोप केला आहे.
अमरावतीच्या जिल्हा बँक निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबलं आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले.
त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी स्वतः गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस स्टेशनला घेराव केला आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यावर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांवर कोणाच्या दबावापोटी गुन्हे दाखल करत असाल तर खबरदार हे खपवून गेल्या जाणार नाही,असे संजय खोडके यांचे नाव घेता सांगितलं.
Oh no! उत्साहात मिठी मारणं पडलं महागात; कपलसोबत काय घडलं पाहा Video
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयामध्ये बसून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. या कार्यालयांचा पुरेपूर वापर केला जात आहे. त्या कार्यालयाच्या दुरुपयोगामध्ये पोलिसांचा देखील वापर होत असतो. दोन्ही कार्यालयात बसून इथल्या पीआयएवर दबाव टाकतोय, इथल्या लोकांवर दादागिरी करतोय. आमच्या कार्यकर्त्यांना उचललं जातं, त्यांच्यावर 353 नुसार कारवाई केली जाते, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.
गृहमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांवर दबाव निर्माण करून याचा दुरुपयोग करून कार्यकर्त्यांना डांबले जात आहे आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती मी हाणून पाडली असंही यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
जेव्हा लग्नाआधी Monalisaने बिग बॉसच्या घरातचं केला होता प्रेग्नेंट असल्याचा....
त्यांनी 10 जणांची यादी तयार केली होती. इथला जो पीआयए चोरमुले आहे, ते खूप बदनाम आणि त्यांची अनेक वादग्रस्त प्रकरण आहे. तो चोरी आणि वसुल्या करत असतो. पण, एवढा घमंड दाखवतो, त्याचा आम्ही निषेध करतो, यापुढे अशी दादागिरी सहन करणार नाही, असंही यशोमती ठाकूर ठणकावून सांगितलं.
तसंच, या गंभीर प्रकारानंतर यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणा विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा बोलणे झाले असून उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Yashomati thakur