• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • तुमचं पुनर्वसन करू, अजित पवारांनी सांगलीतल्या पूरग्रस्त महिलांना दिलं आश्वासन

तुमचं पुनर्वसन करू, अजित पवारांनी सांगलीतल्या पूरग्रस्त महिलांना दिलं आश्वासन

Ajit Pawar In Sangli: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली जिल्ह्यातल्या (Sangli District) पूरग्रस्त (Flood) भागाची पाहणी केली आहे.

 • Share this:
  सांगली, 26 जुलै: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगली जिल्ह्यातल्या (Sangli District) पूरग्रस्त (Flood) भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. तसंच त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. सांगलीच्या पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूर परिस्थितीची पाहणी अजित पवार यांनी केली. यावेळी पूरग्रस्त महिलांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महिलांनी आमचं पुनर्वसन करा असं सांगितलं. यावर अजित पवार यांनी तुमचं पुनर्वसन करू असे आश्वासन दिलं आहे. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच खराब हवामानामुळे मी कोल्हापूरला जाऊ शकलो नाही. कोरोनाच्या काही संबंध येत नाही. हेलिकॉप्टर उड्डाण घेत नसल्यानं मी कोल्हापूर दौरा रद्द करुन सांगलीला आलो. येथे पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक असून त्या बैठकीत या सर्व परिस्थितीचा आढावा मांडून आम्ही योग्य तो निर्णय घेणार असल्याचं अजित पवार म्हणाले. या पाहणीदरम्यान अजित पवारांसोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी उपस्थित होते.
  Published by:Pooja Vichare
  First published: