राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवर

राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवर

उपसभापतीपदासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीची काँग्रेसशी उघडपणे तर भाजपची छुपी मैत्री आहे.

  • Share this:

सागर वैद्य, दिल्ली,ता.17 जुलै : राज्यसभेच्या उपसभापतीपदी कुणाची वर्णी लावायची यावरुन सत्ताधारी विरोधकांसह तिस-या आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे यात महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीची काँग्रेसशी उघडपणे तर भाजपची छुपी मैत्री आहे. ही मैत्री यावेळी कामी येणार असल्याचं बोललं जातंय. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे सुपुत्र नरेश गुजराल यांच्याचही नाव उपसभापतीपदासाठी घेतलं जातंय. शिरोमणी अकाली दलाचे नरेश गुजराल यांचे नाव भाजपाकडून घेतले जाते नरेश गुजराल हे दोनवेळा राज्यसभेचे खासदार होते. नविन पटनाईक यांच्याशीही त्यांचे स्नेहाचे संबंध असल्यानं नरेश यांचे नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच नाव निश्चित केलं जाण्याची शक्यता आहे.

दूध प्रश्नावर तोडगा नाही, आंदोलन सुरूच राहणार

संभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू असल्यानं उपसभापतीपद महिलेकडे असावं असा कयास त्यासाठी बांधला जातोय आणि काँग्रेसशी उघड आणि भाजपशी गुप्त मैत्री ठेऊन असल्या राष्ट्रवादीला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

​अखिल भारतीय आण्णा द्रमुकचे डॉ. व्ही. मैत्रीयन, जनता दल सेक्युलरचे आर.सी.पी. सिंह, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळं भाजपा काँग्रेसमध्ये एकमत झालं नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत उपसभापती पदाची निवडणुक चुरशीची ठरु शकते.

संभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल

VIDEO: गर्लफ्रेंड सांगणे पडले महागात,तरुणीने काठीने झोड-झोड झोडपले

राज्यसभेतलं संख्याबळ 

  • २४४ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपा आणि मित्रपक्षांकडे ११० सदस्य आहेत. बहुमतासा​ठी त्यांना किमान १५ सदस्यांची गरज आहे.

  • काँग्रेसकडे ५० खासदार असून त्यांना समाजवादी (१३), माकप (५), राष्ट्रीय जनता दल (५), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (४), द्रमुक (४), बसपा (४) आणि अपक्ष (१), नामनियुक्त (१), जनता दल धर्मनिरपेक्ष (१), केरळ काँग्रेस  (१), भाकप (१), इंडियन युनियन मुस्लीम लिग (१) आदींचा पाठिंबा आहे. त्यामुळं काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ९१ आहे.

  •  तृणमुल काँग्रेस (१३), तेलंगणा राष्ट्रसमिती (६), वायएसआर काँग्रेस (२) यांची मदत काँग्रेसला झाली तर त्यांची संख्या ११२ वर पोहोचणार आहे.

  • आम आदमी पक्ष (३)  आणि इंडियन नॅशनल लोकदल (१) काँग्रेसला मिळाले तरी विरोधकांची संख्या केवळ ११६ होतेय.

  • त्यामुळं ९ सदस्य असलेल्या बिजू जनता दल, ६ सदस्य असलेले तेलगू देसम पक्ष कोणाला मत देतात यावर उपसभापती पदाचा फैसला होणार आहे. सोमवारी या संदर्भात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला अनुपस्थित राहून बीजू जनता दलाने योग्य तो संदेश दिल्याचं मानलं जातंय.

 

 

 

 

First published: July 17, 2018, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading