मुंबई, 12 ऑक्टोबर : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासांत अधिक खोल होऊ शकते. त्यामुळे याचे रुपांतर वादळात होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टी भागात 20 सेमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही भीती लक्षात घेऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात दक्षिण-पश्चिम मान्सून उर्वरित देशातून परत येण्याची शक्यता नाही. मात्र बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रात येत्या 24 तासात बदल होऊन आज रोजी आंध्र प्रदेशचा उत्तरी किनारपट्टी नरसपूर ते विशाखापट्टणम दरम्यान पार करू शकेल. सध्या हा पट्टा पश्चिम आणि वायव्य दिशेने जात आहे.
The depression over west-central Bay of Bengal is very likely to move westnorthwestwards and cross north Andhra Pradesh coast between Narsapur & Vishakhapatnam tonight: India Meteorological Department
— ANI (@ANI) October 12, 2020
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा व्यतिरिक्त उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशाच्या अंतर्गत भागांत 13 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, “सध्याच्या दबावामुळे पुढच्या आठवड्यात नैऋत्य वारे परत येण्याची शक्यता फारच कमी आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही असे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते".
मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई
बंगालच्या उपसागरावली या क्षेत्रामुळे ओडिशामधील मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या हवामानानुसार हवामान खात्याने असे सांगितले आहे की ओडिशामध्ये येत्या काही दिवस जोरदार पावसासह जोरदार वारे वाहू शकतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा परिस्थितीत ओडिशाच्या किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात जाऊ नका असे सांगितले गेले आहे. येत्या काही दिवसांत दक्षिण ओडिशा येथे 45-55 किमी वेगाने जोरदार वारे वाहतील असा विभागाचा अंदाज आहे.