मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबादमध्ये व्यावसायिक तरुणाची आत्महत्या, कर्जामुळे असलेल्या नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल

औरंगाबादमध्ये व्यावसायिक तरुणाची आत्महत्या, कर्जामुळे असलेल्या नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल

मृत तरुण

मृत तरुण

निलेशवर एका खासगी बँकेचे तब्बल 30 ते 35 लाख रुपयांचे कर्ज होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Khushalkant Dusane

औरंगाबाद, 25 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सैन्य भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाने व्हॉट्सअपवर स्टेट्स ठेवून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना काल औरंगाबादमध्ये समोर आली होती. यानंतर आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोग्यातील सर्जिकल वस्तूच्या डिलरने गळफास घेऊन आत्महत्या केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश मोहन मंगळुरकर (30, रा. प्लॉट नं. 39, सुलोचना अपार्टमेंट, अलंकार हौसिंग सोसायटी, गारखेडा परिसर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण अविवाहित होता. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उल्कानगरीत उघडकीस आला. निलेश मंगळुरकर या तरुणाचे उल्कानगरीत मधुरिका कॉम्पलेक्समध्ये दुकान आहे. तसेच तो शहरातील विविध डॉक्टरांना शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या वस्तुचा पुरवठा करीत होता.

निलेशवर एका खासगी बँकेचे तब्बल 30 ते 35 लाख रुपयांचे कर्ज होते. व्यवसायात होणारा तोटा आणि घेतलेल्या कर्जाचा मेळ बसत नसल्याने तो अनेक दिवसांपासून तणावात होता. कुटुंबातील सदस्यांनाही त्याविषयी माहिती होती. काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास निलेश याच्या भावाने त्याला अनेकवेळा संपर्क साधला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

हेही वाचा - सैन्यात भरती व्हायचं राहुन गेलं, 'everything will be ok' स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

म्हणून त्याच्या भावाने रात्री सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दुकान गाठले. यावेळी दुकानाचे अर्धे शटर उघडे होते. त्यामुळे भावाने आतमध्ये डोकावुन पाहताच त्यास निलेश याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्याने जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक निवृत्ती गायके, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निलेश यास फासावरुन खाली उतरत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासले आणि मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कर्जाच्या तणावातुनच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

First published:

Tags: Aurangabad News, Suicide