Home /News /maharashtra /

शिवसेना हिंदुत्व सोडणार का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातवानं व्यक्त केला हा विश्वास

शिवसेना हिंदुत्व सोडणार का? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातवानं व्यक्त केला हा विश्वास

शिवसेना आणि काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू झाल्यानंतर वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या सेनेच्या मागणीचं काय असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर सावरकरांचे नातू रणजीत काय म्हणताहेत पाहा...

    मुंबई, 15 नोव्हेंबर : वीर सावरकरांचे नातू रणजीत यांनी शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचं एकत्रित सरकार येणार यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची वैचारिक बैठक शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या विरोधातली आहे. शिवसेना प्रमुख दिवंतगत बाळासाहेब ठाकरे यांची ओळख आजही हिंदुहृहयसम्राट अशीच आहे. असं असूनही शिवसेनेनं काँग्रेसशी केलेली जवळीक अनैसर्गिक आहे का, यावर बोलताना रणजीत म्हणाले, "मी उद्धवजींना जितकं ओळखतो, त्यानुसार ते हिंदुत्वाला कधीच तिलांजली देणार नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणीही ते सोडतील, असं वाटत नाही. मला खात्री आहे की, काँग्रेसची हिंदुत्वाबद्दलची भूमिका शिवसेना बदलेल." स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावं, अशी मागणी हिंदुत्ववादी नेत्यांची होतीच. पण शिवसेनेनंही याच भूमिकेचं समर्थन केलं होतं. वाचा - आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही, चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ विधानसभा निवडणुकांच्या आधी सप्टेंबरमध्ये शिवसेनेनं सावरकरांना भारतरत्न द्या, या मागणीसाठी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच हे पत्र पक्षाच्या वतीने लिहिलं होतं. गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडीचं सरकार स्थापन करताना शिवसेना प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेचं काय करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या दरम्यान किमान समान कार्यक्रमाच्या आखणीसाठी बैठका होत आहेत. या किमान समान कार्यक्रमात सावरकरांना भारतरत्न द्यायची मागणी तूर्तास मागे ठेवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याबद्दल सावरकरांचे नातू रणजीत यांना विचारलं असता, त्यांनी शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरेंना आपण ओळखतो आणि ते हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाहीत, याची खात्री असल्याचं मत रणजीत यांनी व्यक्त केलं. जेव्हा स्मृती इराणी तलवारबाजी करता, पाहा हा VIDEO
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Bharatratna, V.D. Savarkar, Veer Savarkar

    पुढील बातम्या