• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मनसे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंना देण्याची पक्षातून मागणी, राज ठाकरे काय घेणार निर्णय

मनसे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद अमित ठाकरेंना देण्याची पक्षातून मागणी, राज ठाकरे काय घेणार निर्णय

Amit Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी (MNS) सेनेचे अध्यक्षपद अमित ठाकरेंना देणार?

  • Share this:
मुंबई, 19 जुलै: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी (MNS) सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेचा (Shiv Sena) झेंडा खांद्यावर घेतला आहे. तेव्हापासून रिकाम्या झालेल्या या पदावर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची निवड केली जावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे दिली जावी, अशी मागणी मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी एक ट्विट देखील केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळकळीची विनंती देखील केली आहे. अमित ठाकरे या क्षेत्रात सक्रिय अमित ठाकरे यांना विद्यार्थी, शिक्षक, पर्यावरण, प्रश्नात अधिक रस असून जेव्हा जेव्हा त्यांच्याशी संबंधित प्रश्न उभे राहिले तेव्हा तेव्हा अमित ठाकरे यांनी पुढाकार घेऊन ते सोडवण्याचे सर्व प्रयत्न केले आहे. मग ते शिक्षक विद्यार्थी यांच्या आंदोलनाला भेटी देणे असो की शिक्षण मंत्र्यांना निवेदन देणे असो. संसदेचे पावसाळी अधिवेशन, या मुद्द्यावरुन घेरणार विरोधक काही दिवसांपूर्वी एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यांच्या घरी जाऊन देखील अमित ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. अमित ठाकरे तरूण असून विद्यार्थी दशेतून बाहेर पडून फार वर्ष झालेली नाहीत त्यामुळे आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Published by:Pooja Vichare
First published: