अद्वैत मेहता (प्रतिनिधी)
पुणे, 11 मे-पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आई-वडिलांच्या आजारपणामुळे त्याला लग्नाला नकार मिळत असल्याने त्याने पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने तरुणाच्या पत्राची तातडीने दखल घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी तरुणाचे समुपदेशन करून त्याला नैराश्यातून बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील दत्तवाडी परिसरातील हा तरुण रहातो. तो 37 वर्षाचा आहे.
तरुणाने काय लिहिले पत्रात..?
'माझं वय 37 आहे, मला 25 हजार पगार आहे. मात्र 73 वर्षांची आई असून तिला पार्किन्सन आहे. 81 वर्षांचे वडील जे वृद्धपकाळात आहेत. या कारणांमुळे माझ्याशी लग्न करायला कुणी तरुणी तयार होत नाही. मी निराश झालो आहे. मला जगाने अपात्र ठरवलं आहे. सबब मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी.'
वैफल्यग्रस्त तरुणाचे पत्र मिळताच मुख्यमंत्री कार्यालयाने पुणे पोलिसांशी संपर्क साधला. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तरुणाची भेट घेतली. त्याचे समुपदेशन केलं आणि त्याला नैराश्यातून बाहेर काढलं. या पुढेही तरुणाच्या आपण संपर्कात राहू आणि त्याला निराशा येऊ देणार नाही, अशी ग्वाही देविदास घेवारे यांनी दिली आहे. मात्र, या घटनेमुळे समाजातील भयान वास्तव समोर आलं आहे.
डॉक्टर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पण पोलीस बसले बघत; अंगावर शहारे आणणारा VIDEO