मुंबई, 23 मार्च : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार दक्षिण मुंबईतील डिलाईल रोड पूल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. ऑगस्ट 2018 मध्ये आयआयटी बॉम्बेच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या मंडळाने पुलाला धोकादायक घोषित केले होते. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या पाच वर्षांपासून हा पूल बंद आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम तीन टप्प्यात सुरू असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या पुलाच्या डेडलाईनमध्ये अनेकवेळा बदल करण्यात आला आहे. नव्या डेडलाईनुसार आता हा पुल ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
तीन टप्प्यांत काम
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पुल रेल्वे आणि महापालिका यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ऑगस्ट 2018 मध्ये आयआयटी बॉम्बेच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या मंडळाने पुलाला धोकादायक घोषित केले होते. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम तीन टप्प्यात सुरू आहे. रेल्वे रुळांच्या वरचा भाग रेल्वेकडून पाडला जात आहे. तर पालिकेकडून मार्ग आणि रॅम्प उभारणीचे काम सुरू आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इतर राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
समुद्रातील 'ती' जागा 600 वर्ष जुनी; काय आहे माहीम दर्गा ट्रस्टचा दावा?
पुलाच्या डेडलाईमध्ये अनेकदा बदल
या पुलाच्या डेडलाईनमध्ये आतापर्यंत अनेकदा बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला हा पूल डिसेंबर 2022 पर्यंत सुरू होणार असा दावा करण्यात येत होता. त्यानंतर पुन्हा एकदा पुलाच्या डेडलाईनमध्ये वाढ झाली. पूल मे 2023 मध्ये सुरू होईल असं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा पुलाच्या डेडलाईमध्ये वाढ करण्यात आली असून, हा पूल आता वाहतुकीसाठी ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. हा पूल मुंबईच्या विविध भागातून लोअर परळमध्ये येणाऱ्या चाकरमाण्यांसाठी लाईफ लाईन मानला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai News