धारदार शस्त्रांनी वार करत मुंबईत डिलिव्हरी बॉयची हत्या

धारदार शस्त्रांनी वार करत मुंबईत डिलिव्हरी बॉयची हत्या

तेज कुमार राम असं या हत्या झालेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.

  • Share this:

मुंबई, 4 ऑगस्ट : हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या 22 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीतील सर्व्हिस रोड लगत असलेल्या भुयारी मार्गावर ही घटना घडली. तेज कुमार राम असं या हत्या झालेल्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे.

विक्रोळीतील एका हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉय असलेला तेज कुमार हा भुयारी मार्गातून सायकलवरून जात होता. तेव्हाच दोन जणांनी त्याचा रस्ता आडवत त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तेज कुमार राम याला जवळील महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

तेज कुमार राम या युवकारव हा हल्ला करण्यात आला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आरोपींची ओळख अजून पटली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. परंतु, त्याला लुटण्याचे हेतूने ही हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शाळेच्या शिपायाकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, धक्कादायक VIDEO VIRAL

Published by: Akshay Shitole
First published: August 4, 2019, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading