Home /News /maharashtra /

निर्भया प्रकरणातील आरोपीला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली

निर्भया प्रकरणातील आरोपीला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली

दोषी विनय शर्माची वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भातील मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

    नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्माची वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भातील मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. 2012 च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले आहे की, 'फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दोषीच्या बाबतीत चिंता आणि नैराश्य स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात मात्र या प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीला पुरेसे वैद्यकीय उपचार आणि मानसिक मदत पुरविली गेली आहे.' निर्भया प्रकरणातील सर्व चारही आरोपींना फाशीची शिक्षा निश्चित झाल्यानंतर ही शिक्षा टाळण्यासाठी आरोपींचा खटाटोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. फाशीला काही दिवस राहिलेले असतानाच निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातला आरोपी विनय शर्मा याने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केलं जखमी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. विनयसह सर्व चार आरोपी दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत आहेत. त्या सर्व आरोपींना वेगवेगळं ठेवण्यात आलं आहे. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था तिथे आहे. मात्र असं असतानाही विनये असा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. गेली 7 वर्ष या सर्व आरोपींवर खटला सुरू असून आता त्यांना फाशी होणार हे निश्चित झालं आहे. 3 मार्चला सकाळी त्यांना तिहारमध्ये फाशी दिली जाणार आहे. आपल्याला फाशी दिली जाणार हे कळल्यानंतर सर्व आरोपींची वागणूक बदलल्याचं पाहायला मिळालं. चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावणार संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकणातील चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावण्यात येणार आहे. पतियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) चारही नराधमांच्या फाशीच्या मुहुर्तावर शिक्का मोर्तब केला आहे. निर्भयाच्या (Nirbhaya Gang Rape Case) आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. कोर्टातमध्ये आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दोषी पवनला कोर्टाने दिलेल्या नव्या वकीलांकडून पहिल्यांदा पवनची बाजू मांडली. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावत नवं डेथ वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या