Home /News /maharashtra /

‘राजधानी’ने सोडला ट्रॅक, पहाटेच्या अपघाताने उडवली प्रवाशांची झोप, वेळापत्रक अजूनही कोलमडलेलंच...

‘राजधानी’ने सोडला ट्रॅक, पहाटेच्या अपघाताने उडवली प्रवाशांची झोप, वेळापत्रक अजूनही कोलमडलेलंच...

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताचा परिणाम अद्यापही रेल्वेच्या वेळापत्रकावर जाणवत आहे. रत्नागिरीजवळ बोगद्यातील बोल्टरला रेल्वेच्या पुढच्या चाकाची धडक बसल्याने हा अपघात झाला.

    रत्नागिरी, 27 जून: दिल्लीहून गोव्याला चाललेली राजधानी एक्स्प्रेस (Delhi-Goa Rajdhani Express) शनिवारी पहाटे कोकण रेल्वेच्या सर्वात मोठ्या बोगद्यापाशी (Tunnel) रुळावरून खाली उतरल्यामुळे एकच खळबळ उडाली. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरीजवळ (Ratnagiri) हा अपघात झाला. बोगद्यातील एक छोटा बोल्डरला (Boulder) रेल्वेचं पुढचं धाक धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी झालेल्या या अपघाताचा परिणाम रविवारी देखील वेळापत्रकावर (Time Table) जाणवत आहे. असा घडला अपघात कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपाशी सर्वात मोठा बोगदा आहे. हजरत निजामुद्दीन-मडगाव जंक्शन राजधानी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी, जी दिल्ली-गोवा राजधानी एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाते, ती पहाटे साडेचारच्या सुमाराला या बोगद्यातून जात होती. त्यावेळी या बोगद्यातील बोल्डरला रेल्वेच्या पुढच्या चाकाची धडक बसली. त्यामुळे इंजिनाचं चाक ट्रॅकवरून खाली घसरल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात कुणीही जखमी झालं नसून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं रेल्वेनं सांगितलं. मात्र प्रवासी झोपेत असताना ही घटना घडल्यामुळं एकच खळबळ उडाली. हेही वाचा- ''तुम्हीही घाबरू नका, माझ्या आईनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले'' रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम हा अपघात घडल्यानंतर पुन्हा ट्रॅक रिकामा करून वाहतूक सुरू होईपर्यंत सकाळचे साडेदहा वाजले होते. रेल्वेनं जाहीर केलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजून 27 मिनिटांनी ट्रॅक क्लिअर करण्यात रेल्वेला यश आलं. म्हणजेच सुमारे 6 तास हे काम सुरू होतं. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या इतर गाड्याही खोळंबल्या होत्या. शनिवारी सकाळी साडेदहानंतर वाहतूक सुरु झाली असली तरी त्याचा परिणाम अद्यापही रेल्वेच्या वेळापत्रकावर जाणवत आहे. पुढील 24 ते 48 तासांत रेल्वेचं वेळापत्रक सुरळीत होईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा- ठाण्याच्या  MH04 लाऊंन्जमध्ये सोशल डिस्टन्सिंगजचा फज्जा, LIVE VIDEO कोकण रेल्वेचा मार्गच बिकट कोकण रेल्वेचा मार्ग हा दऱ्या खोऱ्यांतून, डोंगरातून आणि नद्यांमधून जाणारा असल्याने तो जितका निसर्गरम्य आहे तितकाच तो आव्हानात्मकही मानला जातो. एकूण 756 किलोमीटर लांबीचा हा मार्ग सुरु होतो रोह्यापासून आणि संपतो मंगळुरूजवळच्या ठोकूर स्थानकानंतर तो संपतो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तिन्ही राज्यांमध्ये कोकण रेल्वेचा मार्ग विभागलेला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Railway accident, Ratnagiri

    पुढील बातम्या