राळेगणसिद्धी, 11 फेब्रुवारी : दिल्लीच्या जनेतेनं आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल दिला असून दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांचं सरकार आल्याने अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धी ग्रांमस्थानी केजरीवाल याच्या विजयात सहभागी होत फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
आम आदमी पार्टीचे नेते तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजकीय प्रवास अण्णा हजारेंच्या लोकपाल आणि लोकायुक्ताच्या मागणीसाठी 2011साली झालेल्या आंदोलनासोबत सुरू झाला. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जणआंदोलनाच्या समाजिक क्षेत्रात काम करत असताना अरविंद केजरीवाल यांनी 2 ऑक्टोबर 2012 साली सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात उडी घेत आम आदमी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या डोक्यावर गांधी टोपी घालून सर्वाचे लक्ष वेधले त्यावेळी त्या गांधी टोपीला 'अण्णा टोपी' देखील नावं देण्यात आल होतं.
पक्षाची स्थापना झाल्यानंतर 2013 साली दिल्लीमध्ये अण्णा हजारेंचे शिष्य मानले जाणारे अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्षा शीला दीक्षित यांना कडवे आव्हान देत दिल्लीमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा म्हणजेच 2015 साली दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता.
दरम्यान, 2020 साली पुन्हा भारतीय जनता पार्टीला कडवे आवाहन देत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेवर आपचा झेंडा फडकावला असून केजरीवालांच्या या विजयात अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीयेथील गावकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवत फटाके वाजवून आनंद साजरा केला आहे.
दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You - अरविंद केजरीवाल
दरम्यान, दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर केजरीवालांनी कार्यकर्त्यांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हा दिल्लीकरांचा विजय असून त्यांनी आपल्या मुलावर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला, असं मत त्यांनी व्यक्त केलं. केजरीवाल म्हणाले, 'हा विकासाचा विजय आहे. आम्ही जी कामं केली त्याला लोकांनी पसंत केलंय. दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You' अशी सुरुवातच त्यांनी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांना प्रतिसाद दिला.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, देवानीही आम्हाला साथ दिली. कार्यकर्त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. माझ्या कुटुंबीयांनीही प्रचंड साथ दिली असं सांगत आज माझ्या पत्नीचाही वाढदिवस असल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्नीच्या वाढदिवसाच्या केजरीवालांनी त्यांना विजयाचं गिफ्ट दिलं अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दिल्लीचे निकाल स्पष्ट झाले असून दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना पुन्हा 'आप'लसं केलंय. विधानसभेच्या 70 जापैकी आम आदमी पक्षाला बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने आपला आलेख थोडा उंचावला असून 2015 पेक्षा पक्षाला थोड्याच जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची स्थिती जैसे थे असून काँग्रेसला आपलं खातंही उघडता आलं नाही.