भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर भरदिवसा गोळीबार, घटनेचा VIDEO VIRAL

भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर भरदिवसा गोळीबार, घटनेचा VIDEO VIRAL

भररस्त्यात गोळीबार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि पंजाबचे प्रसिद्ध गायक हंसराज हंस यांच्या कार्यालयाबाहेर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी 5च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नाही. गोळीबार करणाऱ्या इसमाची ओळख पटली आहे. 51 वर्षांच्या रामेश्वर पहलवान यांनी हा हवेत गोळीबार केला आहे. गोळीबार करण्याचं कारण काय होतं? आरोपीकडे बंदूक कुठून आली याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रामेश्वर पहलवानला ताब्यात घेतलं असून कलम 336 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच पोलिसांनी रामेश्वरसोबत असणाऱ्या इतर साथीदारांसोबत हत्यारंही ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवेत दोनवेळा गोळीबार करण्यात आला. हा प्रकार संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान घडला आहे. यावेळी भाजप खासदाराचं कार्यालय बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

या घटनेमध्ये कुणाचा हात असावा का याबाबत दिल्ली पोलिसांनी सध्या माहिती देण्यास नकार दिला आहे. तपासनंतर ही बाब उघड होईल असं सांगितलं आहे. खासदार हंसराज हंस ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना भेटण्यासाठी या कार्यालयात कामकाज करतात. या कार्यालयाची स्थापना निवडणुकीदरम्यान करण्यात आली होती. ही घटना घडण्याआधीच खासदार हंस यांनी कार्यालयातील असलेल्या अधिकाऱ्यांना पंत नगर इथे असलेल्या भाजप कार्यालयात बोलवून घेतलं होतं. त्यामुळे दिल्लीतील रोहिणी वॉर्ड इथे खासदार हंस यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार कऱण्यात आला तेव्हा कार्यालय बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती स्वत: खासदार हंस यांनी दिली आहे.

First published: November 5, 2019, 8:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading