मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Deglur Assembly bypolls result: नांदेडकर अशोक चव्हाणांच्या पाठीशी, चंद्रकांत पाटलांना 'धमकी' भोवली!

Deglur Assembly bypolls result: नांदेडकर अशोक चव्हाणांच्या पाठीशी, चंद्रकांत पाटलांना 'धमकी' भोवली!

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Deglur assembly election bopolls result) निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये तळ ठोकून होते.

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Deglur assembly election bopolls result) निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये तळ ठोकून होते.

देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Deglur assembly election bopolls result) निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये तळ ठोकून होते.

  • Published by:  sachin Salve

नांदेड, 02 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यातील (Nanded) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Deglur assembly election bopolls result) निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp chandrakant patil) आणि काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांच्यात चांगलाच सामना रंगला होता. चंद्रकांत पाटलांनी तर थेट अशोक चव्हाण यांना ईडीच्या (ed) कारवाईची धमकीच दिली होती. पण, नांदेडकर जनतेनं अशोक चव्हाणांच्या पाठीशी उभं राहत काँग्रेसला जिंकून दिलं आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालाची (Deglur assembly election bopolls result) मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. शेवटच्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर यांना 108840 मते मिळाली तर भाजपच्या सुभाष साबणे (Subhash Sabane) 66907 मते मिळाली. यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी जिंकली आहे. जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे.

T20 World Cup : IPL न खेळलेले खेळाडूच वर्ल्ड कपमध्ये फोडतायत 'फटाके', दिग्गज फेल

या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नांदेडमध्ये तळ ठोकून होते.  याच काळात महाविकास आघाडीच्या नेत्याजवळच्या लोकांवर सध्या  केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाया सुरू आहेत. नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात देखील आयकर विभागाने धाड टाकली.  ईडी किंवा आयकर विभागाची आता पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी 'मी काही त्या तपास यंत्रणाचा अधिकारी  नाही. पण माझ्या हसण्यावरून तुम्ही समजून घ्या' असं म्हणत अशोक चव्हाण यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट केलं. एवढंच नाहीतर किरीट सोमय्या हे नांदेडमध्ये येतील आणि त्यानंतर मोठी कारवाई होईल, अशी घोषणाच पाटील यांनी केली होती.

पण, किरीट सोमय्या काही नांदेडमध्ये आलेच नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा दावा पार फुसका निघाला होता. विशेष म्हणजे, अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांच्या आरोपांवर शक्यतो बोलण्याचे टाळले. विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी  भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली होती. भाजपने उमेदवार आयात केल्याने काँग्रेसला ही निवडणूक जड जाणार होती. त्यात अशोक चव्हाण यांनी देखील खेळी केली. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना काँग्रेसमध्ये आणलं.  भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपा चांगलच धक्का लागला.

Maxima Pro X6 Smartwatch लाँच,10 दिवस बॅटरी बॅकअप;रोजच्या Activity रेकॉर्ड होणार

राज्यात आधीच महाविकास आघाडीच्या आमदारांपासून ते उपमुख्यमंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाकडून कारवाई केली जात आहे. भाजप नेत्यांची हाच कित्ता नांदेडमध्येही गिरवला पण अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडकरांनी चव्हाणांची साथ देऊन भाजपच्या नेत्यांना चांगला धडा शिकवला आहे.

First published: