अमरावती, 29 एप्रिल : वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या (Deepali Chavan Sucide case) प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निलंबित अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी (Srinivasa Reddy) यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यासह निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनीही अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरली होती. अखेर तपासाअंती धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. धारणी पोलिसांनी आज गुरुवारी पहाटे रेड्डी यांना अटक केली आहे.
Success Story: चहा विकून कोट्याधीश झाला 'हा' व्यक्ती, महिन्याला कमावतो 1.2 कोटी
0दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली होती. त्यानंतर मार्च महिन्यात या प्रकरणात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आणि अप्पर प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांना लेखी खुलासा आयोगाने मागावला होता. तसंच, पदावरून हटवण्यात आले होते. या प्रकरणी सर्वात आधी 25 मार्च रोजी DFO विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विनोद शिवकुमारला अटक केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.