मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्यांना अतिशय तरूण वयात संधी मिळाली त्यामुळे..'; पंकजा मुंडेंच्या नाराजीवर केसरकरांची प्रतिक्रिया

'त्यांना अतिशय तरूण वयात संधी मिळाली त्यामुळे..'; पंकजा मुंडेंच्या नाराजीवर केसरकरांची प्रतिक्रिया

केसरकर (Deepak Kesarkar) पुढे म्हणाले, की मला स्वतःलाही खात्री नव्हती की या मंत्रिमंडळात मला घेतील का

केसरकर (Deepak Kesarkar) पुढे म्हणाले, की मला स्वतःलाही खात्री नव्हती की या मंत्रिमंडळात मला घेतील का

केसरकर (Deepak Kesarkar) पुढे म्हणाले, की मला स्वतःलाही खात्री नव्हती की या मंत्रिमंडळात मला घेतील का

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 12 ऑगस्ट : राज्यातील मिनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यापासून पंकजा मुंडेंच्या नाराजीपर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, की आता सगळे मंत्री कामाला लागले आहेत. विस्तारावेळी शिंदे गटाच्या वाट्याला 9 च मंत्रिपदं आली. त्यात 7 जुनेच मंत्री आमच्यासोबत होते. त्यामुळे आणखी दोन नावं कोणाची घ्यायची याबाबत मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा होता असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीत होणार मोठा वाद? कोणी नाराज तर कोणी आक्रमक, नेमकं चाललंय काय? केसरकर पुढे म्हणाले, की मला स्वतःलाही खात्री नव्हती की या मंत्रिमंडळात मला घेतील का. संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याने सध्या बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले होते. यावर प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले , की संजय राठोड हे समाजाच्या लाखो लोकांचं नेतृत्व करतात. वर्षभरापूर्वी चौकशी झाली आहे, मात्र चित्रा वाघ म्हणत असतील तर आणखी चौकशी करता येईल. आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आले. आरे कारशेड प्रकरणात उध्दव ठाकरे यांचा इगो आडवा आला का? यावर बोलताना ते म्हणाले की मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही BJP State President : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईचा अध्यक्ष बदलण्याच्या तयारीत दोघेही फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय दरम्यान राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आलेली नाही. पंकजा मुंडे यांनाही यातून वगळ्यात आलं आहे. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की पंकजा मुंडे यांना भविष्यात मोठी संधी आहे. त्यांना अत्यंत तरूण वयात संधी मिळाली आहे . त्यामुळे त्यांच्याकडे आणखी भरपूर वेळ आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांना अजूनही मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, असा अप्रत्यक्ष दावा केसरकरांनी केला आहे.
First published:

Tags: BJP, Pankaja munde

पुढील बातम्या