'नारायण राणे ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची सत्ता जाते'

'नारायण राणे ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची सत्ता जाते'

ज्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यांनी या महाशिवआघाडीबाबत अनुकूल राहिले पाहिजे असंही केसरकर म्हणाले.

  • Share this:

कल्याण, 19 नोव्हेंबर : शिवसेनेचे आमदार आणि माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली आहे. नारायण राणे ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची सत्ता जाते. अशा शब्दात केसरकरांनी राणेंवर टीका केली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना ज्याला महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यांनी या महाशिवआघाडीबाबत अनुकूल राहिले पाहिजे असंही केसरकर म्हणाले. निवडणूकीत अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेला संपवण्याची ही खेळी होती. मात्र, ती यशस्वी होऊ शकली नाही. असा टोलाही यावेळी केसरकरांनी लगावला.

दीपक केसरकर यांनी नेवाळी आणि 14 गाव परिसरात जाऊन केली शेतीची पाहणी. शिवसेना शेतकरी मदत केंद्र उभारणार. नेवाळी विमानतळाच्या जागेततील शेतीचे सुद्धा पंचनामे करण्याची मागणी केसरकरांनी केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. 'ज्याच्याकडे बहुमत आहे त्याने सरकार स्थापन करावं. त्यांना शुभेच्छा. दरम्यान, भाजपच्या सत्तास्थापनेसाठी नारायण राणे नेमक्या कोणत्या पक्षाचे आमदार भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करत आहेत, याबाबत स्पष्टता नाही.' असं संजय राऊत म्हणाले होते.

मोठी बातमी - शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजप थाटणार मनसेसोबत संसार, नाशिकमध्ये झाली बैठक

निलेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका, म्हणाले...

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्वीट करत खोचक टीका केली आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची आणि दिल्लीत एनडीएची बैठक नाकारायची.. संजय राऊत हे गल्लीतल्या कुसक्या म्हाताऱ्यासारखे आहेतय जे सगळे ठीक असले तरीही सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालत बसतात, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेवरून शिवसेना-भाजप युतीत फूट पडली आहे. मुख्यमंत्रिपदावरून राज्यात युतीचे बिनसल्यानंतर शिवसेनचे एकमेव केंद्रीय मंत्री यांच्यासह सहा खासदारांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसल्याचे भाजप नेत्याकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच शिवसेना खासदारांची लोकसभा आणि राज्यसभेतही वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

यावर संजय राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. आम्हाला एनडीएतून काढणारे तुम्ही कोण असा थेट सवाल सेनेने केला आहे. आम्ही एनडीएत नसल्याची घोषणा कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने केली, असेही विचारणा केली आहे. एनडीएच्या जन्मकळा आणि बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या असून ज्यांनी ही घोषणा केली त्यांना सेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म माहिती नसल्याचा टोलाही लगावला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 19, 2019, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading