शिवसेना नेता म्हणाला, नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारचा विकासावर जास्त भर

शिवसेना नेता म्हणाला, नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारचा विकासावर जास्त भर

विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर आपसूक नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल

  • Share this:

गडचिरोली, 30 ऑगस्ट: जिल्ह्यातील नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारनं विकासावरच अधिक भर दिला आहे. विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर आपसूक नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल, असं प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केलं.

हेही वाचा...जेव्हा अचानक पोलीस येतात! रेव्ह पार्टी करणाऱ्या डझणभर तरुण-तरुणींना अटक

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात तब्बल 777 कोटींची रस्ते व पुलांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आलं. दिल्लीहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्राणहिती नदीवरील निजामाबाद सिरोंचा असरअल्ली जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग 63 वरील पूल कामाची किंमत 168 कोटी, इंद्रावती नदीवरील पातागुडम जवळील 248 कोटींचा पूल, लंकाशेनू येथील बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी यांना जोडणारा 7.71 कोटींचा पूल, बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी या राज्य महामार्गाची दुरुस्ती 25.81 कोटी, गारंजी पुस्तोला रस्त्याची 35.62 कोटी रुपयांची दुरुस्ती या कामांचं लोकार्पण करण्यात आलं तर पेरीमिली नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 43.23 कोटी, बांडीया नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 72.59 कोटी, पर्लकोटा नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 77.98 कोटी, वैनगंगा नदिवरील तेलंगणा सीमा ते कोरपना, गडचांदूर, राजूरा, बाम्नी, आष्टी जोडणारा पूल 98.83 कोटी असा कामांचं भूमिपूजन करण्यात आलं.

विकासाला चालना मिळणार....

तब्बल 777 कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. अहेरी, भामरागड, लाहेरी आदी दुर्गम भागांमधील या रस्ते व पुलांमुळे पावसात या परिसराचा संपर्क टिकून राहील, वाहतूक अबाधित राहील, तसेच आरोग्य व शिक्षण व्यवस्थाही अधिक बळकट करता येईल, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...'केंद्राने 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवायला सांगितल्या, मग परीक्षा कशा घेणार?'

गडचिरोलीला विकासाच्या मुख्य धारेत आणून नक्षलवादाचा कणा मोडणे, याला सरकारचे प्राधान्य आहे, असंही प्रतिपादन यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी केले. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Published by: Sandip Parolekar
First published: August 30, 2020, 6:27 PM IST

ताज्या बातम्या