मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं घेतला मोठा निर्णय

प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं घेतला मोठा निर्णय

प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवारी आंदोलन केलं. पण....

प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवारी आंदोलन केलं. पण....

प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवारी आंदोलन केलं. पण....

पंढरपूर, 1 सप्टेंबर: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवारी (31 ऑगस्ट) आंदोलन केलं. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्यासोबतच्या 11 कार्यकर्त्यांना मंदिरात प्रवेश करून मुखदर्शनही घेतलं होतं. तरी देखील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंदच राहणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंदिर समितीनं घेतला आहे. हेही वाचा...शिवसेना-MIM आमने-सामने; खासदार इम्तियाज जलील यांनी मंदिर आंदोलन घेतलं मागे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबर पर्यंत दर्शनासाठी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. 22 मार्चपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. अनलॉकच्या चौथा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. यात धार्मिक स्थळं आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्यण राज्य सरकारनं घेतला आहे. त्यानुसार मंदिर समितीने मंगळवारी एका पत्राद्वारे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्यण जाहीर केला आहे. दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर खुले करावे, या मागणीसाठी कालच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली पंढरपुरात आंदोलन केलं होतं. आठ दिवसांनी मंदिर उघडले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना आश्वासन दिले होते. राज्य सरकारनं सरकारच्या या आश्वासनाला काही तास उलटून गेल्यानंतर लागलीच मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे वंचित आणि वारकरी संघटना काय भूमिका घेतात याकडेच लक्ष लागले आहे. हेही वाचा...प्रकाश आंबेडकरांनी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द अनलॉक-4 मध्ये काय सुरू होणार काय बंद राहणार... -हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार. -शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार. -30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही. -खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा. -सिनेमागृह 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंदच. -मंदिर आणि जिमबद्दल अद्याप कोणतीही घोषणा नाही. -सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स आणि बिअर बारवरील बंदी कायम -संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही. -आता आवश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच या नियमावलीचे पालन करतील.. - मुंबई आणि एमएमआर एरिया तसेच पुणे पिंपरी या क्षेत्रांमध्ये ऑफिसमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थिती राहता येईल. -या सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य राहील. - जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी आता ई-पास गरज नाही. - प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा. - खासगी चारचाकी वाहनात चार लोकांना प्रवास करण्याची मुभा. -50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही. -अंत्यविधी यासाठीदेखील 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही.
First published:

Tags: Pandharpur news, Prakash ambedkar, Vitthal mandir pandharpur

पुढील बातम्या