बाणेर अपघातातील मृत मुलीची आईचाही उपचारादरम्यान मृत्यू

बाणेर अपघातातील मृत मुलीची आईचाही उपचारादरम्यान मृत्यू

पूजा विश्वकर्मा असे या महिलेचे नाव असून पूजा यांच्या अडीच वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला होता.

  • Share this:

18 एप्रिल :  पुण्यातील बाणेर रस्त्यावर भरधाव मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूजा विश्वकर्मा असे या महिलेचे नाव असून पूजा यांच्या अडीच वर्षाच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला होता. यामुळे आता मृतांची संख्या 2 वर गेली आहे.

पुण्यातल्या बाणेरमधल्या  काल एक भीषण उपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि विश्वकर्मा कुटुंबिय एकमेकांचे शेजारी आहेत.  डी मार्टमधून खरेदी करून घरी जात असताना हा अपघात घडला. बाणेर रोडवरील रस्ता ओलांडण्यासाठी त्या दुभाजकावर थांबल्या असताना भरधाव वेगात असलेल्या मोटारीने त्यांना उडवले.

काहीही चूक नसताना डिव्हायडरवर उभे असताना कार चालक महिलेचा ताबा सुटल्याने या दोन्ही चिमुरड्यांना नाहक जीव गमवावा लागला. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

या अपघातात अडीच वर्षाच्या इशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर पूजा यांच्यासह चार जण जखमी झाले होते.

दरम्यान,  सुजाता श्रॉफ इतक्या बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या महिलेचं नाव आहे. तीही रुग्णालयात दाखल आहे. तिला डिस्चार्ज मिळाल्यावर पोलीस तिला अटक करतील.

First Published: Apr 18, 2017 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading