नागपूरमध्ये उष्माघाताने आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये उष्माघाताने आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू

Heat Wave : उष्माघातामुळे नागपुरात आतापर्यंत 47 जणांचा जीव गेला आहे.

  • Share this:

नागपूर, प्रविण मुधोळकर, 04 जून : दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे. वाढतं ऊन जीवावर बेतत असून उष्माघातामुळे नागपुरात आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी चार मृतदेह हे रस्त्याच्या कड्याला आढळून आले आहेत. नागपुरातील पाचपावली आणि नरेंद्र नगर पुलाखाली दोन अनोळखी व्यक्तिंचे मृतदेह आढळले. तर, माळीनगर चौकात अभय जानेकर आणि सतनामीनगरमध्ये संघपाल सहारे यांचा मृतदेह सापडला. वाढतं ऊन जीवावर बेतत असून उष्माघातामुळं मृत्यू पडलेल्यांची संख्या ही 47 वर गेली आहे.

देशासह राज्यात सध्या पारा 45च्या वर पोहोचला आहे. त्याचा परिणाम हा आता माणसांवर होताना दिसत आहे. एकंदरीत सारी परिस्थिती पाहता नागरिकांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे. उष्माघातामुळे नागरिकांचा जीव जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी नागपुरातील तापमान हे 47 डिग्री सेल्सिअसच्या देखील पुढे गेलेलं आहे. वातावरणातील उष्मा प्रचंड वाढल्यानं नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. पालिकेनं देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. वाढत्या उन्हामुळे आता सर्वांची नजर ही पावसाकडे लागली आहे.

पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी - उद्धव ठाकरे

राज्यात पाडणार कृत्रिम पाऊस

राज्यात पाऊस उशीरा येणार असल्याचं हवामान खात्याने सांगितल्याने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत टेंडर काढलं जाईल त्यानंतर काम दिलं जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. या प्रयोगासाठी 30 कोटी खर्च अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. धरण क्षेत्रात पाऊस पडण्याचा अधिक प्रयत्न केला जाणार आहे. मराठवाडा - विदर्भ भागातील अवर्षणग्रस्त भागातही हे प्रयोग केले जातील. सोलापूरमध्ये एक रडार याआधीच उभारण्यात आले आहे त्याचीही मदत होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

नागपुरातलं तापमान आता पन्नाशी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. शहरातील तापमानाचा पारा आता 47 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. वातावरणातील उष्मा प्रचंड वाढल्यानं नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. उष्मागातामुळे आत्तापर्यंत 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

VIDEO: वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये निघाल्या अळ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading