मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : अंबानी कुटुंबीयातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी दिली ही माहिती

VIDEO : अंबानी कुटुंबीयातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी दिली ही माहिती

आज दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवर एका क्रमांवरुन फोन आला होता.

आज दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवर एका क्रमांवरुन फोन आला होता.

आज दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवर एका क्रमांवरुन फोन आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 ऑक्टोबर : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण -

याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवर एका क्रमांवरुन फोन आला होता. या कॉलमध्ये अज्ञातांनी सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला उडवण्याची धमकी दिली होती. यासोबत या अज्ञात व्यक्तीने अंबानी परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणाला मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया डीबी मार्ग पोलीस ठाण्यात सुरू आहे.

दरम्यान, यानंतर सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी सतर्क आहे. लवकरच यातील अज्ञात आरोपीला अटक करुन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. अंबानी परिवारातील काही सदस्यांची नावे, या अज्ञात कॉलमध्ये घेण्यात आली आहे. काही मिनिटांचा हा कॉल होता. याबाबत विश्लेषण पोलीस पथक करत आहे. तसेच या प्रकरणाचा तपास डीबी मार्ग पोलीस करत आहेत.

हेही वाचा - अंबानी कुटुंबीयांना धमकी प्रकरणातील संशयिताचा आणखी एक प्रताप उघड, याआधीही...

तर मागच्या वेळी ऑगस्ट महिन्यात याच हॉस्पिटलच्या लँडलाईन नंबरवर जो फोन आला होता, त्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपींना अटक केली होती आणि या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली होती. यानंतर याचप्रकारची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Mukesh ambani, Nita ambani