तलावात पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू

सायंकाळपर्यंत खेळणारी मुलं आता नाहीत या विचारानेच त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा थरकाप उडालाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 09:53 PM IST

तलावात पोहायला गेलेल्या भावंडांचा बुडून मृत्यू

जळगाव 16 ऑगस्ट : जळगाव शहरातील मेहरुण तलावात पोहायला गेलेल्या तीन भावंडांपैकी दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली. दोन्ही भावांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात जेव्हा आणण्यात आले तेव्हा नातेवाईकांचा मन हेलावून सोडणारा आक्रोश बघून सर्वांचीच मने हळहळली.

मोहंमद अनस जकी अहमद (वय 14), महंमद उमेर जकी अहमद (वय 12) आणि मोहंमद अबूलैस जकी अहमद (वय 16, तिघही रा. अल अजीज अपारमेंट अक्सा नगर, मेहरूण जळगाव) हे आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास एकत्र मेहरूण तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तिघे भाऊ पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने महंमद उमेर आणि अबूलैस जकी हे पाण्यात बुडाले.

गाडीला धक्का लागल्याचा बनाव करून लुटमार, भामट्यांची टोळी जेरबंद

तर अनिस जकी थोडक्यात बचावला. दरम्यान, तिघेजण बुडत असताना बाजूला असलेल्या परवेज अख्तर, सबिरोद्दीन पिरजादे, बबलू पिरजादे यांनी अनिस याला वाचविले. परंतू दोघांना ते वाचवू शकले नाहीत. दरम्यान, दोघं भावंडांचे मृतदेह बाहेर काढत जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने अहमद कुटुंबीयांवर दु:खाचा पहाडच कोसळलाय. सायंकाळपर्यंत खेळणारी मुलं आता नाहीत या घटनेनेच त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा थरकाप उडालाय.

Loading...

खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा बळी

पावसामुळे ठाण्यात रस्त्यांची चाळण झालीय. खड्ड्यांमध्ये रस्ता की रस्त्यांमध्ये खड्डे हेच नागरिकांना कळत नाहीये. मेट्रोचं सुरू असलेलं काम. त्यातच उन्हाळ्यात जलवाहिन्या आणि ड्रेनेज सिस्टिम दुरुस्तीसाठी खोदून ठेवलेले सर्व्हिस रोड यामुळे गाडी चालवणं हे अतिशय कठीण काम झालंय. याच खड्ड्यांमुळे ठाण्यात आणखी एका चिमुकल्याचा बळी गेलाय. पण प्रशासन आणि कंत्राटदार ठिम्म असून आणखी किती बळी जाणार असा सवाल विचारला जातोय.

सरकारमध्ये आमचा हस्तक्षेप असतो, पण...मोहन भागवतांनी उघड केलं मोठं गुपित

ठाण्यात गुरुवारी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एका 5 वर्षांच्या चिमुकल्याचा नाहक बळी गेलाय. मात्र पोलिसांनी वाहन चालकाचा हलगर्जीपणा असा गुन्हा दाखल करत वाहन चालकाला अटक केलीय. पण ज्या अधिकारी आणि कंत्राटदारांमुळे रस्ता खराब झाला होता, ज्यांनी आपलं कर्तव्य नीट पार पाडलं नाही त्या अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

मोफत 'मिक्सर'ची भाजप आमदाराची घोषणा बेतली महिलांच्या जीवावर

वेदांत दास असं त्या चिमुकल्याचे नाव असून रक्षाबंधनासाठी  वेदांत आपल्या आई वडिलांसह दुचाकीवर ठाण्यात आला होता. पाहुण्यांकडे जात असतांना घोडबंदर रोडवर असलेल्या सिमेंट आणि डांबरी रस्त्याच्यामध्ये असलेल्या फटीमध्ये वेदांतचे वडील चालवत असलेली गाडी फसली आणि तोल जाऊन वेदांत रस्त्यावर पडला तोच मागून भरधाव वेगाने येणारं अवजड वाहन वेदांत वरुन गेल्याने वेदांतचा जागीच मृत्यू झाला. दास कुटुंब हे घणसोली इथं राहत असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...