Home /News /maharashtra /

अवघे गाव रडले, सुनेच्या मृत्यूनंतर सासुनेही सोडले प्राण; एकाचवेळी निघाल्या 2 अंत्ययात्रा

अवघे गाव रडले, सुनेच्या मृत्यूनंतर सासुनेही सोडले प्राण; एकाचवेळी निघाल्या 2 अंत्ययात्रा

सासू-सुनांमध्ये अनेक ठिकाणी खटके उडतात, तर काही ठिकाणी हे नाते मायलेकीप्रमाणेही असते. साकेगावातील सासू-सुनांचे नाते मायलेकीप्रमाणेच होते.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी  भुसावळ, 12 ऑक्टोबर : सासू-सुनांमध्ये खड वाद समाजात अनेक ठिकाणी दिसून येतो. मात्र, साकेगावातील सासू - सुनांचे प्रेम मृत्यूनंतरही कायम राहिले. सुनेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच सासुचाही हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  सासू-सुनांतील ही माया व वास्तल्य साकेगाव परिसरारात चर्चेचा विषय ठरली. साकेगाव येथील रहिवासी रंजनाबाई सुरेश मनोरे ( वय 48) यांना पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शस्त्रक्रियेदरम्यान रंजनाबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती रविवारीच साकेगावात कळाली. रंजनाबाईंच्या सासूबाई मिराबाई गोविंदा मनोरे ( वय 65) यांनाही ही माहिती समजल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. नोव्हेंबरपर्यंत राज्य अनलॉक करण्याचा निर्णय घेतला तर...,तज्ज्ञांनी दिला इशारा सुनेच्या निधनाचा विरह सहन न झाल्यामुळे सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी  पहाटे 3 वाजता मिराबाई यांचाही हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. तर दुसरीकडे पुणे येथून सून मिराबाई यांचे पार्थिव गावात आणले गेले. यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास सासू-सुनेच्या  मृत्यूदेहावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आला. सुनेच्या विरहात सासुचाही दुर्देवी मृत्यू झाला. सासू मिराबाई मनोरे यांच्या पश्चात 3 मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. तर रंजनाबाई यांच्या पश्चात पती दोन मुले आहेत. 'जिभेची तलवारबाजी लोकं आता...' शिवसेनेचा संभाजीराजेंना सल्ला सासू -सुनांमध्ये अनेक ठिकाणी खटके उडतात, तर काही ठिकाणी हे नाते मायलेकीप्रमाणेही असते. साकेगावातील सासू-सुनांचे नाते मायलेकीप्रमाणेच होते. सोमवारी दोन्हींच्या अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्याने अनेकांचे डोळे पाणवले. आजच्या युगा सासू सुनांचे पटत नाही. मात्र, मनोरे परिवारातील सून रंजना आणि सासू मिराबाई यास अपवाद ठरल्या. अशी चर्चाही साकेगावात होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या