जळगावमध्ये शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू

जळगावमध्ये शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू

जळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पारोळ्यामध्ये शेतात काम करत असताना वासुदेव श्रवण पाटील यांना भोवळ आली. सरकारी कुटीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण दुर्दैवानं त्यांना वाचवता आलं नाही.

  • Share this:

जळगाव, 27 मार्च : जळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पारोळ्यामध्ये शेतात काम करत असताना वासुदेव श्रवण पाटील यांना भोवळ आली. सरकारी कुटीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण दुर्दैवानं त्यांना वाचवता आलं नाही. शरीरातलं पाणी कमी झाल्यानं त्यांना उष्माघात झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलंय.

अजून एप्रिल महिना उजाडायचा आहे. मात्र त्याआधीच महाराष्ट्रात वैशाख वैणव्याचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातल्या भिरामध्ये यंदाच्या सर्वाधिक म्हणजे 45 अंशं सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. आजही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.. नागपुरात पारा 39वर गेलाय, आणि एप्रिलमध्ये तर तापमान 45 ते 47वर जाईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय..

First published: March 27, 2018, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading