Home /News /maharashtra /

महावितरणाचा हलगर्जीपणामुळे; खांबात वीज प्रवाह उतरल्याने शॉक लागून मुलाचा मृत्यू

महावितरणाचा हलगर्जीपणामुळे; खांबात वीज प्रवाह उतरल्याने शॉक लागून मुलाचा मृत्यू

 महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन थातुरमातुर पाहणी केली. मात्र, काहीही काम न करता तेथून काढता पाय घेतला होता.

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन थातुरमातुर पाहणी केली. मात्र, काहीही काम न करता तेथून काढता पाय घेतला होता.

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन थातुरमातुर पाहणी केली. मात्र, काहीही काम न करता तेथून काढता पाय घेतला होता.

जालना, 25 मे : महावितरणच्या हलगर्जीपणा (Negligence of MSEDCL) संदर्भातील घटना तुम्ही याआधीही वाचल्या असतील. या हलगर्जीपणामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. यातच आता महाराष्ट्रातालील जालना (Jalna) जिल्ह्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरण कंपनीच्या विद्युत खांबांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरला. यामुळे नाहक एका निरागस बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. (Death Due to Electric Shock) ही घटना जुन्या जालन्यातील राहुल नगर भागात घडली. सूर्यकांत सर्जेराव म्हस्के (वय12) असे मृताचे नाव आहे. या खांबाचा यापूर्वीही अनेकांना विजेचा शॉक लागला होता. विनंती करुनही कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले यानंतर त्या भागातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या मोतीबाग परिसरातील कार्यालयात दूरध्वनी करून कळविले होते. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन थातुरमातुर पाहणी केली. मात्र, काहीही काम न करता तेथून काढता पाय घेतला होता. महावितरण कंपनीचे कर्मचारी तेथून निघून गेल्यानंतर काही वेळातच तेथे खेळणाऱ्या सूर्यकांत सर्जेराव म्हस्के (वय12) या मुलास विजेच्या खांबाचा स्पर्श झाल्याने त्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. (हेही वाचा - पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दाऊद इब्राहिम नातेवाईकांना दर महिन्याला पाठवतो 10 लाख रुपये, ED च्या चौकशीत झाला खुलासा)
महावितरण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळेच या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मयत मुलाचे वडील सर्जेराव म्हस्के यांच्या फिर्यादीवरून महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध भादंवि. 304 (अ), 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, नाशिकमध्ये (nashik) एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या ( software engineer ) दुर्दैवी मृत्यूची बातमी समोर आली आहे. आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या या तरुणाचा विजेचा जबरदस्त झटका ( electric shock) लागला. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील इंदिरा नगर राजसारथी सोसायटी इथं ही घटना घडली आहे. अनिरुद्ध धुमाळ (anirudha dhumal) (वय 30) असं तरुणाचं नाव आहे. अनिरुद्ध धुमाळ हा सॉफ्टेवअर इंजिनिअर होता.
Published by:News18 Desk
First published:

पुढील बातम्या