Home /News /maharashtra /

बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकली, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकली, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

कुटुंबीयांसमवेत फराळाचे साहित्य माव घेऊन नातेवाईकाकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

अमरावती, 17 नोव्हेंबर : दिवाळी (Diwali) सण साजरा करण्यासाठी  कुटुंबीयांसमवेत फराळाचे साहित्य घेऊन नातेवाईकाकडे जाणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा बैलगाडीच्या (bullock cart) चाकात ओढणी अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धारणी तालुक्यात घडली आहे. अस्मिता छगन भिलावेकर (16, राहणार, भुलोरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.  अस्मिता ही टेंब्रुसोडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत नवव्या इयत्तेत होती. अस्मिताचे आई, वडील, आजी आणि आजोबा हे तिच्या मावशीकडे दिवाळीच्या निमित्ताने मन्सूधावडी येथे बैलगाडीने निघाले होते. मासे सापडतील म्हणून पाण्याची टाकी केली खाली, सापडली कवटी आणि हाडं,पुण्यातील घटना रस्त्याने जात असताना अस्मिताच्या गळ्यातील ओढणी अचानक बैलगाडीच्या चाकात अडकली. अस्मिताच्या कुटुंबीयांनी गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, ओढणी काढता आली नाही. त्यामुळे तिला गळफास लागला आणि काही क्षणात तिचा मृत्यू झाला. अवघ्या 16 वर्षांच्या अस्मिताचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे रस्त्यावर आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. त्यानंतर स्थानिकांनी आणि कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ऐन दिवाळीच्या सणात अस्मिताचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रायगड चढत असताना शिवभक्ताचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू दरम्यान, रायगड जिल्ह्यात ऐन दिवाळीत रायगडावर शिवभक्ताचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रमेश तुकाराम गुरव असं निधन झालेल्या शिवभक्ताचं नाव आहे. पायऱ्या चढत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरव यांचा मृत्यू झाला. पुण्यात मिठाईचं दुकान उचकटून चोरी करणाऱ्या झुरळ्याला पोलिसांनी केलं थेट गजाआड दिवाळीत रायगडावर दीप प्रज्वलित करण्याची प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते. लॉकडाउननंतर अनलॉक झालेल्या महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटक यायला सुरुवात झाली होती. मुंबई येथील विद्याविहारमधून आलेल्या 8 जणांनी रायगडावर पणत्या लावण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता गड चढण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण ग्रुपवर रायगडावर जात असताना काही वेळातच रमेश तुकाराम गुरव यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर महाड ग्रामीण रुग्णालयात आणेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. महाड तालुका पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. फराळ आणि गोडधोड खाल्ल्याने वजन वाढण्याचं टेन्शन? 'या' पदार्थांमुळे राहाल फिट ! दरम्यान, दिवाळीसारख्या आनंदाच्या सणामध्येच रायगडावर जाताना एका शिवभक्ताचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या