डोंबिवली, 05 सप्टेंबर : काही महिन्यांपूर्वी मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याची घटना घडली होती. आता डोंबिवलीमध्येही अशीच घटना समोर आली आहे. उंदराने डोळे कुरतडल्याने (rat nibble eyes of patient) रेल्वे कर्मचारी(खलाशी कर्मचारी) सुरेश साळवे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सुरेश यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
डोंबिवली (dombivali) जवळील ठाकुर्ली (thackurli) येथे रेल्वे वसाहतीत राहणारे सुरेश साळवे बुधवारी रात्री झोपले असताना उंदराने त्याचा डोळा कुरतडला आणि नख खाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना कल्याण येथील रेल्वे रुग्णलयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अती मद्यसेवानामुळे त्यांचे लिव्हर डॅमेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात दिले आहे. त्याच्या लिव्हरवर यापूर्वी सुद्धा उपचार सुरू होते, अशीही माहिती समोर आली.
अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी विवाहित शिक्षिकेला अटक, वाचा सविस्तर
मात्र, उंदराने डोळा कुरतडल्याने सुरेश यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. रेल्वे वसाहत असलेल्या परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्याने त्याठिकाणी उंदराचा सुळसुळाट आहे. त्याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. या मृत्यूनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राजावाडी रुग्णालयातील घटना
मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात जून महिन्यात अशीच एक घटना घडली होती. अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे गंभीर प्रकरण समोर आले होते. श्रीनिवास यल्लपा असं या 24 वर्षीय रुग्णाचे नाव होते. त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते.
करुणा शर्मा अटक प्रकरणाला धक्कादायक वळण, गाडीजवळ 'ती' महिला कोण? VIDEO
त्याला मेंदूज्वर आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. यावर त्याच्यावर उपचार सुरू असताना नातेवाईकांनी रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आले. रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dombivali