गरम चटणीच्या भांड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

गरम चटणीच्या भांड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

तनुष्का रामास्वामी असं या चिमुकलीचं नाव आहे. चटणीच्या गरम टोपात ती पडली आणि 80 टक्के भाजल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

21 फेब्रुवारी : सांबार बनवण्यासाठी तयार केलेल्या गरम चटणीच्या भांड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली आहे. तनुष्का रामास्वामी असं या चिमुकलीचं नाव आहे. चटणीच्या गरम टोपात ती पडली आणि 80 टक्के भाजल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

तनुष्काचे वडील रामास्वामी हे इडली-सांबर विक्रते आहेत. सकाळी 5च्या सुमारास रामास्वामी यांनी गरम चटणी भांड्यात तयार करून ठेवली होती. खेळता खेळता तनुष्का त्या भांड्याजवळ गेली आणि त्यात ती पडली. ती गरम चटणीत पडली.

या दरम्यान नेमकाच तिच्या चेहऱ्याचा भाग थेट टोपात पडला आणि 80 टक्के भाजली आणि उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. सकाळी तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारदेखील सुरू झाले. मात्र, काल दुपारी १ वाजता तिचा मृत्यू झाला.

First published: February 21, 2018, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading