पिंपरी चिंचवड, 6 जुलै- ड्रेनेजच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात पडून 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी शहरातील CEM ह्या लष्करी हद्दीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रहिवासी क्षेत्रात ही घटना घडली आहे. CEM व्यवस्थापनाच्या हलगर्जी पणाचा हा बळी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला करण्यात आला आहे.
श्रीरंग जोशी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी (5 जुलै) दुपारीही ही घटना घडली. CME परिसरात ड्रेनेजसाठी खड्डे खोदले जात आहेत. त्यात पावसामुळे पाणी साचले आहे. तिकडे खेळण्यासाठी गेलेल्या श्रीरंगचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली आहे. खड्डे खोदल्यानंतर त्या भोवती सुरक्षेचा उपाय म्हणून जाळी का लावण्यात आली नव्हती. श्रीरंगला तिकडे जाण्यापासून का रोकल्या गेले नाही. याबाबत CME प्रशासनाकडून अद्याप कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही. दरम्यान, शुक्रवारी भोसरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
पुणे-इंदूर एक्स्प्रेसने मळवली रेल्वेस्थानकावर दोघांना चिरडले
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इंदूर एक्स्प्रेसने दोघांना चिरडल्याची घटना मळवली रेल्वेस्थानकावर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घडली. मृतांमध्ये 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा समावेश आहे. महेंद्र चौधरी आणि सतीश हुलावळे (32) अशी या मृतांची नावे आहेत.
मिळालेली माहिती अशी की, काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस होता. पावसादरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना त्यांच्याकडे असलेल्या छत्रीमुळे या दोघांना इंदूर एक्स्प्रेस दिसली नाही. भरधाव एक्सप्रेसने दोघांनाही चिरडले. अपघातात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. लोणावळा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
VIRAL VIDEO : रिफाइंड तेलाचा टँकर उलटला, तेलासाठी ग्रामस्थांची उडाली झुंबड