• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नाल्यात बुडून 4 वर्षांच्या चिमुरड्याचा करुण अंत, उल्हासनगरमधील घटना

नाल्यात बुडून 4 वर्षांच्या चिमुरड्याचा करुण अंत, उल्हासनगरमधील घटना

रुद्र सायंकाळी 7 च्या सुमारास नाल्याच्या शेजारी लघुशंकेसाठी गेले होता. याच दरम्यान त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला.

  • Share this:
उल्हासनगर, 18 जुलै : मुंबईत (mumbai rain) पावसाने धुमशान घातले आहे.  मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, उल्हासनगरमध्ये (ullhasnagar) अशाच एका नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र बबलू गुप्ता असं या मृत चिमुरड्याचे नाव आहे. उल्हासनगर कॅम्प ३ च्या शांतीनगर गऊबाई पाडा परिसरातील ही घटना आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत राहणार रुद्र सायंकाळी 7 च्या सुमारास नाल्याच्या शेजारी लघुशंकेसाठी गेले होता. याच दरम्यान त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला. बराच वेळ झाला मात्र रुद्र घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी नाल्याच्या बाहेर रुद्रची चप्पल होती. त्यामुळे तो नाल्यात पडल्याचा संशय घरच्यांना आला. कोरियन महिलांप्रमाणे रात्री त्वचेसाठी करा हे उपाय; ओळखू येणार नाही तुमचंही वय अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी नाल्यात शोध घेत रुद्रला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुराच्या पाण्यात पोहणे जीवावर बेतले, दोघांचा बुडून मृत्यू दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पाण्याचा प्रवाह वेगवान असताना पोहण्यासाठी उतरलेल्या सहा मुलांपैकी दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,  सदरची घटना धामापूर घारेवाडी येथे घडली आहे.  संगमेश्वर तालुक्यातील धामापूर घारेवाडी इथं आज दुपारी ३.३० च्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (वय ३२), चेतन सूर्यकांत सागवेकर (१८) दोघेही राहणार धामापूर घारेवाडी हे गायमुख परिसरात वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याबरोबर वाहत जावून या दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांनी दिली. रात्री उपाशी पोटी झोपायची सवय आजच बंद करा; आरोग्य घालताय धोक्यात... या मुलांसोबत असणाऱ्या औदुंबर प्रकाश पवार (27) , शुभम शांताराम चव्हाण (20) , राज तुकाराम चव्हाण (18), साईल संतोष कांगणे (17) या चौघांनी बुडणाऱ्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही. शैलेश आणि चेतनच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी चेतनचा बुडून मृत्यू झाल्यामुळे सागवेकर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
Published by:sachin Salve
First published: