नितीन नांदूरकर, प्रतिनिधीजळगाव, 11 मे : मागील सहा वर्षांपासून एका प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला असलेल्या एका तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यामुळे जळगावमध्ये (jalgaon) खळबळ उडाली आहे. या तरुणाचा अपघाती मृत्यू (murder) झाला असं सांगितलं आहे. पण, डोळ्यावर व्रण दिसून येत असल्यामुळे कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील तरसोद येथील कुबेर जितेंद्र राजपूत हा २२ वर्षीय तरुण मागील 6 वर्षापासून जळगाव येथे शिवतेज प्रिंटींग प्रेसमध्ये कामावर होता. तो आज देखील कामावर वेळेवर आला होता. सायंकाळी कंपनी मालकांकडून कुबेरचे पाहुणे दीपक यांना फोनवरून कुबेर चक्कर येऊन खाली पडल्याची' माहिती दिली. त्याला बेशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून सिव्हीलमध्ये दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
(महापालिका निवडणुका तात्काळ लागल्यास अडचणींचा डोंगर, मंत्रिमंडळ बैठकीत खलबतं)
माहिती मिळताच कुबेरच्या कुटुंबीयांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. यावेळी त्यांनी कुबेरच मृतदेह बघितल्यावर त्यांना त्याच्या दोन्ही डोळ्यात व्रण आढळून आलेत. यामुळे त्याच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून कंपनीकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
('तेरे संग प्यार मैं...' नागिणीच्या मृत्यूनंतर कोब्रा बसून होता मृतदेहाजवळ)
यावेळी कुबेरचे वडील जितेंद्र राजपूत यांनी त्यांच्या मुलाला कोणी शासकीय रुग्णालयामध्ये भरती केले याची माहिती नसल्याचे सांगितले तर कुबेर याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये व्रण दिसत असून हा अपघात नेमका झाला कसा? याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कुबेरच्या कुटुंबीयांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.