भंडारा , 09 जानेवारी : नुकतेच जगात आलेल्या 10 नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये ( Bhandara District General Hospital) घडली आहे. मध्यरात्री अचानक आग लागल्यामुळे अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठे आधारवड आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जन्मल्यानंतर नवजात बालकला काही त्रास उद्भ्वल्यास, वजन कमी असल्यास, बाळाची प्रकृती ठीक नसल्यास त्याला अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) ठेवण्यात येत असते.
SNCU यूनिट हे पूर्णपणे काचेनं बंद असते, यात तापमान हे बाळाच्या प्रकृतीनुसार नियंत्रित केले जाते. या ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिकांव्यतिरिक्त कुणालाही आत जाण्यास परवानगी नसते. आधीच प्रकृती नाजूक असल्यामुळे नवजात बाळांची विशेष काळजी घेतली जात आहे.
सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालक दाखल होती. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.
त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी होती. नवजात बालकांचे पोस्ट मॉर्टेम करणार नाही. कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.