कोपर्डी प्रकरणाचा 5 मिनिटांत फैसला, काय घडलं कोर्टात?

कोपर्डी प्रकरणाचा 5 मिनिटांत फैसला, काय घडलं कोर्टात?

तिन्ही आरोपींना कोर्टाने बलात्कार, खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली.

  • Share this:

29 नोव्हेंबर : कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी टाळण्यासाठी गयावया करणाऱ्या नराधमांचा फैसला अवघ्या 5 मिनिटांत लागलाय. कोर्टात नेमकं काय घडलं आणि संपूर्ण घटनाक्रम...

कोपर्डी प्रकरणाचा अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात आला. 18 नोव्हेंबर 2017 ला कोर्टाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय. त्यानंतर 22 नोव्हेंबरला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला. त्यानंतर आज या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. तिन्ही आरोपींना कोर्टाने बलात्कार, खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली.

कोर्टात काय घडलं ?

सकाळी 9.40 मिनिटांनी आरोपींना मागच्या दाराने कोर्टात आणलं.

त्यानंतर 10 वाजता पीडित मुलीचे आईवडील कोर्टात आले.

11.20 मिनिटांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टात आले.

11.25वा-सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले कोर्टात पोहचल्यात आणि तिन्ही आरोपींना समोर बोलवलं.

मात्र, तिन्ही आरोपींच्या वकिलांना बोलवण्यात आलं, मात्र तिघंही गैरहजर होते.

11.30 वाजता - तिन्ही आरोपींना फाशी-जन्मठेप आणि तीन-तीन वर्षांची शिक्षा सुनावत असल्याची घोषणा केली.

- न्यायालयाच्या बाहेर असलेल्या लोकांनी निर्णयाचं उत्साहात स्वागत केलं.

कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा घटनाक्रम

13 जुलै 2016 –रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पीडितेवर अमानुष अत्याचार करुन हत्या

15 जुलै 2016 – जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यात अटक

16 जुलै 2016 –संतोष भवाळला अटक

17 जुलै 2016 –तिसरा आरोपी नितीन भैलुमे अटकेत

18 जुलै 2016 –दोन आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला

24 जुलै 2016 –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला भेट

7 ऑक्टोबर 2016 – तिन्ही आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

1 एप्रिल 2017 – कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला

22 जून 2017 – खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 31 साक्षीदार तपासले

2 जुलै 2017 –कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय

12 जुलै 2017 – कोपर्डी घटनेच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला नगरला कॅण्डल मार्च

13 जुलै 2017 – घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने निर्भयाला श्रद्धांजली अर्पण

9 ऑक्टोबर – खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण

18 नोव्हेंबर 2017 - तिन्ही आरोपी दोषी

21 नोव्हेंबर 2017 - दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैलुमे यांच्या वकिलांचा शिक्षेवर युक्तीवाद, कमीत कमी शिक्षेची मागणी

22 नोव्हेंबर 2017 - दोषी नंबर 2 – संतोष भवाळच्या वकिलांचा युक्तीवाद

घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणताही सामाजिक दबाव नसावा, असा युक्तीवाद दोषीच्या वकिलांनी केला.

त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यामुळे त्यांना फाशीच द्यावी, अशी मागणी केली.

29 नोव्हेंबर 2017 -तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading