Home /News /maharashtra /

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह 40 किलोमीटर अंतरावर सापडला

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह 40 किलोमीटर अंतरावर सापडला

पावसामुळे आलेल्या पुरामध्ये वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील भुलोडा परिसरात बाबूलाल खडसे हे वाहून गेले होते.

वाशिम, 21  जून: पावसामुळे आलेल्या पुरामध्ये वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील भुलोडा परिसरात बाबूलाल खडसे हे वाहून गेले होते. अखेर त्यांचा मृतदेहआज तब्बल 40 किलोमीटर लांब असलेल्या अमरावती जिल्ह्यातील टाकळी गिलबा परिसरात आढळून आला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली होती. वापटी कुपटी इथले 55 वर्षीय बाबुराव खडसे हे 12 जूनच्या रात्री 8 वाजताचा सुमारास घरी जात असतांना भूलोडा नजीकच्या नाल्याला पूर आलेला होता. त्या नाल्याच्या पुलावरून मोटारसायकलने पुढे जात असतांना अंधारामुळे बाबूलाल खडसे यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते मोटारसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. वाहून जाताच रात्र असल्यामुळे त्यांचा शोध घेणं शक्य नव्हतं. त्यामुळं प्रशासन आणि कारंजा इथल्या सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे प्रमुख श्याम सवाई यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबूलाल खडसे यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली त्यांनतर काही अंतरावर बाबुलाल यांची मोटारसायकल सापडली मात्र त्यांचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता. ही शोध मोहीम दरदिवशी राबविण्यात आली तरी शोध लागत नव्हता. अखेर आज बाबुलाल खडसे यांचा मृतदेह घटनास्थळापासून 40 किलो मीटर दूर असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी गिलबा परिसरातील नाल्यात आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं कुटुंबीय आणि नातेवाईकांनि तिथेच अंत्यविधी उरकला. बाबूलाल खडसे हे टेलरिंग काम करून घरी परत येत असतांना पुराच्या रूपाने नियतीनं अचानक त्यांच्यावर झडप घालून त्यांना कुटुंबासून कायमचे हिरावून नेले. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाबूलाल खडसे यांना जर पुराच्या पाण्याचा अंदाज जरी आला असता तरी ते पूल पार करत नव्हते मात्र त्या पुलाला कठडे तसेच कोणतीही निशाणी नसल्यानं पूल ओलांडत असतांना मोटरसायकल सह वरील थेट नाल्यात पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असावेत. बाबूलाल खडसे यांच्या मृत्यूमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. संपादन- रेणुका धायबर
First published:

पुढील बातम्या