गणेश गायकवाड (प्रतिनिधी),
अंबरनाथ, 11 मे- वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात मेलेली पाल आढळल्याची धक्कादायक घटना मुरबाडमध्ये घडली आहे. मुरबाड म्हसा या ठिकाणी असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी (10 मे) रात्री वसतिगृहातील विद्यार्थी जेवण करत असताना एका विद्यार्थ्याच्या जेवणात ही पाल आढळली. या जेवणात पालीचे डोके शाबूत असून अर्धा भाग जेवणात मिसळल्याची विद्यार्थ्यांनी शंका आली. हा प्रकार समोर येताच विषबाधा होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रथोमोपचार घेतल्याने 15 ते 16 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.
दरम्यान, या विद्यार्थ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून हा सगळा प्रकार सांगितला. जेवणाची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जाते आहे. हा प्रकार घडला तेव्हा सुरक्षारक्षक आणि इतर कोणतीही कर्मचारी जागेवर नसल्याचा आरोप विद्यार्थी करतायेत. आता या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
VIDEO: अंधेरी स्टेशनमध्ये अवंतिका एक्सप्रेस अंगावरून धावल्यानंतरही 'तो' सहीसलामत!